आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरोबाने प्रेमविवाह करून पत्नीला लावले देह विक्रीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या १७ वर्षीय युवतीची २५ वर्षीय युवकाची ओळख झाली, ओळखीनंतर प्रेम प्रेमाचे रुपांतर विवाहात झाले. ती युवती अल्पवयीन असतानाही त्याने एका मंदिरात हार टाकून लग्न केले. लग्न केल्यानंतर स्वत: तर त्याने युवतीवर अत्याचार केलाच मात्र लग्नापासून अवघ्या पाचव्याच दिवसापासून पत्नीला देह विक्रीसाठी लावले, यामधून येणाऱ्या रकमेतून त्याने रक्कमही बळकावल्याचा गंभीर आरोप या पीडित अल्पवययीन युवतीने केला आहे. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी रविवारी (दि. १८) पतीसह त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोमवारी सकाळी पोलिसांनी या नराधम पतीला अटक केली आहे.
अक्षय (२५ रा. अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. अक्षयची काही महिन्यापूर्वी एका १७ वर्षीय युवतीसोबत ओळख झाली होती. ही युवती जिल्ह्यातील एका गावची असून दोन वर्षांपासून घर सोडून एकटीच शहरात आली आहे. दरम्यान खासगी कंपनीत काम करून ती आपला उदरनिर्वाह चालवत होती. काही दिवसानंतर त्याच कंपनीत काम करणाऱ्या अक्षयसोबत तिची ओळख झाली, त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

वास्तविकता त्या युवतीचे वय १७ वर्षच होते, कायद्याप्रमाणे ती विवाह करू शकत नव्हती. मात्र तरीही या दोघांनी जानेवारी २०१६ ला रेणुकापूर येथील देवीच्या मंदिरात जाऊन लग्न केले. त्यानंतर दोघेही पती पत्नी म्हणून गाडगेनगरमध्ये भाड्याने खोली घेऊन एकत्र राहू लागले. त्याने तत्पूर्वी या युवतीवर अत्याचार केलाच होता. मात्र लग्न केल्यानंतर अवघ्या पाचव्याच दिवशी अक्षयने स्वत:ची घाणेरडी वृत्ती दाखवली. त्याने या अल्पवयीन पत्नीला थेट देह विक्रीच्या कामी लावले, स्वत:चे मित्र, परिचित व्यक्ती यांच्याकडे तो पाठवू लागला. या व्यवसायातून आलेल्या रकमेचा तोच वापर करत होता.

हा प्रकार जानेवारी महिन्यापासून सुरू आहे, मात्र नाईलाजाने आपण हे सर्व सहन करत असल्याचे युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. हे काम करण्यासाठी नकार दिल्यास त्याने अश्लील छायाचित्र व्हीडीओ काढून ठेवले असून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १८) उघड झाल्यामुळे पोलिसांनी अक्षय विरुध्द बलात्कार, बालविवाह प्रतिबंध कायदा, महिलेला देह विक्रीसाठी लावून येणाऱ्या रकमेचा वापर करणे तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलमाद्वारे गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल किनगे त्यांच्या पथकाने सोमवारी (दि. १९) सकाळीच त्याला अटक केली आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपी मात्र फरार आहेत.

आणखी दोघांचा शोध सुरू
^पीडितेच्या तक्रारीवरून आम्ही तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मुख्य आरोपीस अटक केली. प्रकरण गंभीर असून दोन आरोपींना अटक करायची आहे, त्यांचा शोध सुरू आहे. कैलाशपुंडकर, ठाणेदार गाडगेनगर.

शहरात सलग तिसऱ्या दिवशी बलात्काराचा गुन्हा
अमरावती शहरात शुक्रवार (दि. १६) ते रविवार (दि. १९) या तीन दिवसात सलग तीन बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहे. तिन्ही घटना या गंभीर आहे. शुक्रवारी खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात झालेल्या गुन्ह्यात नराधम वर्ग शिक्षकाने सात वर्षीय मूकबधिर चिमुकली सोबत अत्याचार केला आहे. शनिवारी कोतवाली पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात एका महिलेवर तिच्याच परिचित व्यक्तीने अत्याचार केला तसेच तिची आर्थिक फसवण्ूकसुध्दा केली. या दोन घटना ताज्या असताना रविवारी रात्री गाडगेनगर पोलिसात अल्पवयीन पत्नीने तिच्या पतीचे घाणेरडे कारनामे पोलिसांना तक्रारीतून मांडले आहे.
बातम्या आणखी आहेत...