आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीवर अत्याचार, तर दुसरीचा केला विनयंभग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महिला अत्याचाराविरुद्ध कायदा कितीही कडक केला असला, तरी त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात एका अपंग युवतीवर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याची, तर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी सोमवारी (दि. १९) अटक करून न्यायालयात हजर केले.
शेंदूरजना घाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका गावातील १८ वर्षीय अपंग युवती घरी एकटी असल्याची संधी साधून परिसरातीलच एका युवकाने तिच्या अंपगत्वाचा गैरफायदा घेत शुक्रवारी तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर पोलिसांत तक्रार दिल्यास नातेवाईकाच्या लहान मुलाला विहिरीत फेकून देण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र ही बाब कुटुंबीयांना माहित होताच त्यांनी शेंदूरजना घाट पोलिस ठाणे गाटून तक्रार नोंदवली. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी सोमवारी गावातून अटक केली. सुरेश राजू वाढीवे असे अारोपीचे नाव असून, पोलिसांनी वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर केले. घटनेचा तपास पीएसआय आशिष गंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दुसऱ्या एका घटनेत लग्न करण्यास नकार दिलेल्या एका अल्पवयीन युवतीचा गावातीलच एका २३ वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची घटना शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. धम्मदीप राजू धाकडे असे आरोपी युवकाचे नाव आहे. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला रविवारी राहत्या घरून अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार एस. के. फरकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू इंगळे करीत आहे.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण : दिवसेंदिवसशहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडणाऱ्या या घटनांमुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुली महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

महिलेचा विनयभंग करून मुलांना मारहाण
मागील आठ दिवसांतील विनयभंग अत्याचाराच्या घटना पाहता गुरुवारी धारणी तालुक्यातील एका गावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या ४५ वर्षीय महिलेचा गर्दीचा फायदा घेत रविकांत गोपाल धुर्वे अन्य दोघांनी विनयभंग केला. इतकेच नव्हे, तर पोलिसांत तक्रार दाखल केली म्हणून तिच्या दोन मुलींना मारहाण केली.
बातम्या आणखी आहेत...