यवतमाळ- आर्णी शहरता भरधाव वेगात असलेल्या ट्रकने महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. या आपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहे. नलू गोपाल झाडे (वय 40 वर्षे रा. माणुसदरी ता. घाटंजी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पती गोपाल झाडे यांच्यासोबत नलू झाडे या भावाला भेटण्यासाठी आर्णी येथे आल्या होत्या. परंतु, शहरातील बेग गॅस एजन्सीजवळ भरधाव ट्रकने त्यांना त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याच्या भागाचा चेंदामादा झाल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर पती गंभीर जखमी झाले आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड केली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.