आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्याने प्रेयसीने लावला गळफास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि. ७) रात्री घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या मुलीच्या प्रियकराविरुद्ध छेड काढल्याची तक्रार मुलीच्या मोठ्या बहिणीनेच पोलिसात दिली होती. या तक्रारीमुळे प्रियकराला त्रास झाला म्हणून तिने हा टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
एका १६ वर्षीय मुलीचे शहरातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, या प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळेच या १६ वर्षीय मुलीच्या मोठ्या बहिणीने काही दिवसांपूर्वी लहान बहिणीच्या प्रियकराविरुद्ध छेड काढल्याबाबतची तक्रार पोलिसांना दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटकसुद्धा केली होती. मात्र, या प्रकरणात प्रियकराचा काही दोष नाही. त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे मृतक मुलीने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. ही चिठ्ठी गाडगेनगर पोलिसांनी जप्त केली आहे. प्रियकराला त्रास झाल्यानेच हा निर्णय घेतल्याचेही तिने नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात तपास सुरू असल्याचे गाडगेनगरचे ठाणेदार कैलाश पुंडकर यांनी सांगितले.