आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS - ZP मध्‍ये महिलांनी पेटवली चुल, अधिका-यांना दिल्‍या भाकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशाप्रकारे चुल पेटवून महिलांनी भाकरी बनवल्‍या. (सर्व छाया - मनीष जगताप) - Divya Marathi
अशाप्रकारे चुल पेटवून महिलांनी भाकरी बनवल्‍या. (सर्व छाया - मनीष जगताप)
अमरावती - जिल्‍हा परिषदेच्‍या आवारातील उपहारगृह चालवण्‍यासाठी द्या या अशी मागणी अमरावतीमधील एका बचत गटाच्‍या महिलांनी जिल्‍हा परिषदेकडे केली. मात्र या मागणीची कोणतीच दखल न घेतल्‍याने महिला संतप्‍त झाल्‍या. त्‍यांनी थेट जिल्‍हा परिषदेच्‍या आवारातच चूल पेटवून झुणका भाकर बनवली. मुख्‍य कार्यपालन अधिका-यांसह इतरांना महिलांनी भाकरीचे वाटप केले. मागणीकडे लक्ष वेधून घेण्‍यासाठी महिलांनी केलेले हे अनोखे आंदोलन चांगलेच गाजले. divyamarathi.com वर पाहा आंदोलनातील आक्रमक महिलांचे फोटो.
झोपडी उभारून पेटवली चूल
याच मागणीसाठी महिलांनी यापूर्वी आंदोलन, उपोषण केले, उपोषणादरम्‍यान काही महिलांची प्रकृती अस्‍वस्‍थही झाली होती. यासंदर्भात प्रशासनाकडून महिलांना केवळ आश्‍वासने मिळाली. त्‍यामुळे महिलांनी थेट झुणका भाकर बनवण्‍याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद पार्किंगच्या जागेत या महिलांनी झोपडी उभारून चूलही पेटवली.
न्‍यायालयाचा निर्णय बाकी
महिलांच्‍या या मागणीवर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. त्‍यानंतर यावर विचार करता येईल असे प्रशासनाने सांगितले. या प्रसंगी महिलांची महिला पोलिसांसोबत धक्‍काबुक्‍कीही झाली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संतप्‍त महिलांच्‍या आंदोलनाचे फोटो..