आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६० हजारांवर कर्मचारी संपावर, तब्बल २० पेक्षा अधिक संघटनांचा होता सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - केंद्रीय कामगार संघटनांच्या आवाहनानुसार, शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील ६० हजारांवर कामगार-कर्मचारी संपावर गेल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता, तर बँक बंद असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली.दरम्यान, स्थानिक नेहरू मैदान येथे संपात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शासनाला सोपवले.
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा विरोध करीत केंद्रीय कामगार संघटनांकडून हा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. संघटित-असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता. महागाई सातत्याने वाढत असताना किमान वेतनात वाढ करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सार्वजनिक सेवांचे कंत्राटी करण करणे, मानधन तत्वावर कार्यरत कामगारांना सेवेत कायम करणे आदी प्रमुख मागण्यांना घेऊन हा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजकमल चौक स्थित नेहरु मैदान येथे एकत्रित येत दुपारी वाजता हजारो कर्मचारी-कामगारांनी मोर्चा काढला. राजकमल चौक, जयस्तंभ, इर्वीन चौक, गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या माेर्चाचे रुपांतर जाहिर सभेत झाले. यावेळी कामगार नेत्यांनी मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. देशातील बहुसंख्य जनतेचे जीवनमान सुधारले पाहिजे. विषमता कमी झाली पाहिजे, उद्योगाच्या विकासातून गुणवत्तापूर्ण रोजगार निर्मिती करुन बेरोजगारांना काम देणारी अर्थव्यवस्था देशात हवी आहे. कामगारांचे हक्क अबाधित ठेऊन त्यांचा विस्तार करण्याची धोरणे आवश्यक आहे. कामगारांवर गुलामी लादणारे कंत्राटीकरण संपवायचे आहे. आरोग्य सुविधा पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा योजना कर्मचारी असंघटित कामगारांना देणे गरजेचे असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. मंचावर जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिलचे अध्यक्ष प्रा. उदयन शर्मा, कार्याध्यक्ष व्ही. एन देवीकर, सरचिटणीस पी. बी. उके, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, आयटकचे जे. एम. कोठारी, सी. बानुबाकोडे, सिटूचे सुभाष पांडे, रमेश सोनुले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे डी. एस. पवार, एच. डी. घोम, पोस्टल एम्लाईज युनियन ए. एस. गिरनाळे, एस. आर. चतुरकर, ऑल इंडिया बँक एम्प्लाईज असोसिएशनचे सुधीर लसनापुरकर, मनोज शर्मा, ऑल इंडिया इंशुरन्स एम्प्लाईज असोसिएशनचे नितीन डफळे, आशिष पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे नीळकंठ ढोके, अशोक सिरसाठ, घरकामगार- मोलकरीण संघटनेचे इंदू बोके, मंगला भाेगे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (आयटक) बी. के. जाधव, ममता सुंदरकर, अरुणा देशमुख, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सिटू) पद््मा गजभिये, सफिया खान, पाटबंधारे कर्मचारी युनियनचे अशोक दंडाळे, राजेंद्र गायगोले, एमएसएमआरएचे अभय देव, महेंद्र बुब, उमेश बनसोड, सुनील घटाळे, अनिल पेंढारी, वंदना बुराडे, वंदना लोणपांडे, संगिता लांडगे, कांता रायकवार आदी उपस्थित होते.
बँकांचेव्यवहार ठप्प : जिल्ह्यातीलसर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प झाले. तब्बल ६५०० हजार कर्मचारी संपावर असल्याने ग्राहकांवर देखील आल्यापावली परत जाण्याची वेळ आली. सर्वच राष्ट्रीय कृत बँका बंद असल्याने जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प होता.

शासकीय कामकाज प्रभावित
मोठ्या संख्येने असलेले राज्य कर्मचारी या देशव्यापी संपात सहभागी झाल्याने शहातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय तसेच महसूल विभागाची बहुतांश कार्यालये कर्मचाऱ्यांअभावी ओस पडली होती. संपामुळे शासकीय कामकाज देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते.

कर्मचाऱ्यांचा सहभाग
संघटना कर्मचारी
राज्य कर्मचारी ४०,०००
जिल्हा परिषद ३०००
राष्ट्रीयकृत बँक ६५००
ग्रामपंचायत कर्म. १५००
आशा कर्मचारी २०००
अंगणवाडी कर्म. ६९००
एनआरएचएम २०००
शालेय पोषण १२००
नर्सेस ५००
शिक्षक १०००
पाटबंधारे ५००
एमएसएमआरए ५००
एलआयसी २००
वीज कर्मचारी ७००
आरटीओ १००
पोस्ट १००
एकूण ६६७००
बातम्या आणखी आहेत...