आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारी हाच उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुमार वाढणारी वाहनांची संख्या अपुरे पडणारे रस्ते यामुळे देशात रस्ता अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस लक्षणिय वाढत आहे. सोमवारी (दि. १७) जागतिक ‘ट्रामा डे’च्या निमित्ताने अपघातात होणारी जीवितहानी अपंगत्व टाळण्यासाठी खबरदारी घेतल्यास होणारे मोठे नुकसान टळू शकते असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जगभरात १७ आॅक्टोबर हा जागतिक ट्रामा डे म्हणून साजरा केला जातो. जगभरात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या प्रचंड आहे. शासकीय आकडेवारीनुसार आपल्या देशात दरवर्षी चार लाख मृत्यू अपघातामुळे होतात. दर पाच मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचे शासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. अपघातास वाहनांची प्रचंड संख्या, वाहनचालकांचा बेजाबदारपणा, मद्यपान, रस्त्यांची दुरवस्था आदी विविध कारणे कारणीभूत मानली जातात. परंतु वाहनचालकांनी काही खबरदारी घेतल्यास अपघात टळून मोठी हानी टळू शकते. दरम्यान, अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त नागरिकाला तातडीने प्राथमिक उपचार मिळाल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास मोठी जीवितहानी टळू शकते. यासाठी वाहन चालकांनी दुचाकी वाहनावर हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. वाहन चालवताना मोठ्याने गाणे ऐकणे टाळावे, चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्टचा सातत्याने वापर करावा, लांबचा प्रवास करताना मध्ये थांबा घ्यावा, अपघात झालेला व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्याला तोंडाने काहीही देऊ नये, फ्रॅक्चर किंवा सूज असल्यास अवयव आधाराशिवाय हलवू नये, रुग्णाला हलविताना मानेला आधार द्यावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडणारे रस्ते अन् वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दररोज कित्येकांची बळी जात आहेत. वाहन चालवताना माेबाइलचा वापर केल्यामुळे बहुतांश अपघात घडत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

अपघातग्रस्तांना नेहमीच द्यावा मदतीचा हात
^अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर आघात झालेला असतो. त्यामुळे अपघाताची संख्या कमी व्हावी या उद्देशाने जागतिक ट्रामा दिवस साजरा केला जातो. अपघातग्रस्ताला मदत देण्यासाठी कुणाचेही हात त्वरित पुढे आल्यास एखाद्याचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदतीसाठी बघ्याची भूमिका घेता पुढे येणे आवश्यक आहे. -डॉ. राधा सावदेकर, एम.डी. (भूलतज्ज्ञ)
बातम्या आणखी आहेत...