आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Hanging: Memon Brothers Unease In Dwarka Hotel

भाईजान, सारी उम्मीदे खत्म हो गई! हॉटेल द्वारकाने अनुभवली मेमनबंधूंची अस्वस्थता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - काहीतरी चमत्कार घडेल या आशेने ‘त्यांच्या’ नजरा टीव्हीवर होत्या. रात्र सरत होती तशा आशा संपुष्टात यायला लागल्या होत्या. मात्र न्यायालयाने गुरुवारी पहाटे याचिका फेटाळल्याची ब्रेकिंग न्यूज झळकली अन‌् अस्वस्थ झालेला याकूबचा भाऊ उस्मान हा सुलेमानच्या खोलीत पोहाेचला. ‘भाईजान, सारी उम्मीदे अब खत्म हो गई..’ उस्मानचे हे वाक्य दुसरा भाऊ सुलेमानला धीर खचण्यास पुरेसे ठरले..

याकूबला भेटण्यासाठी नागपुरात अालेले त्याचे हे दाेन भाऊ सीताबर्डी हनुमान गल्लीतील हॉटेल द्वारकामध्येच मुक्कामाला हाेते. सुलेमान खोली क्रमांक ४०१ मध्ये तर उस्मान १०१ मध्ये वास्तव्याला होता. बुधवारी दिवसभर ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात होते. सायंकाळी कारागृह भेटीनंतर दोघेही रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेलवर परतले. त्यावेळी ते जेल प्रशासन याकूबचा मृतदेह सोपविणार की नाही ही चिंता त्यांना सतावत होती. हॉटेलचा व्यवस्थापक रवीकुमार तेलमोरे याच्याकडे सुलेमानने आपली ही व्यथा बोलून दाखविली होती. रवीकुमारने त्यांच्यासाठी किरकोळ नाष्टा पाठविल्यावर तो बराचसा टाकून दिल्याचे रूमबॉयचे म्हणणे आहे.

अभी उम्मीद बची है...
सुलेमान आणि उस्मानला रात्रीतून चमत्काराची आशा वाटत होती. दोघांच्याही नजरा टीव्हीवर लागल्या होत्या. त्याचवेळी सुलेमानचा मोबाइल सातत्याने खणखणत होता. मुंबईतील कुटुंबीयांना ‘अभी उम्मीद बची है..’ असे सांगून धीर देण्याचे त्याचे प्रयत्न सुरूच होते. हॉटेलचा व्यवस्थापक रवीकुमार तेलमोरे हा देखील दर अर्धा तासाने खोलीत जाऊन त्याची ख्यालीखुशाली विचारायचा. खोलीत चहा पाठवायचा. तो तसाच पडलेला असायचा. मेमनबंधू अस्वस्थ रात्र अनुभवत असताना हॉटेलच्या लॉबीत माध्यम प्रतिनिधींची प्रचंड गर्दी जमलेली होती. सुमारे पावणेपाचच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची ब्रेकिंग न्यूज झळकली. तसा अस्वस्थ झालेल्या उस्मानने चवथ्या माळ्यावरील सुलेमानची खोली गाठली.. “भाईजान सारी उम्मीदे खत्म हो गई..’ असे सांगत डोळे डबडबलेल्या अवस्थेत उस्मानने त्याला कवटाळले. सुलेमानच्या खोलीत गेलेला वॉर्डबॉय या अस्वस्थ क्षणाचा साक्षीदार होता.

फाेनची धास्ती
न्यायालयाच्या निर्णयानंतर सुलेमानने नंतर कुटुंबीयांना मुंबईत फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला. ‘आता कुठल्याही क्षणी याकूबला फाशी दिल्याचा फोन येणार, या जाणिवेनेच सुलेमान चांगलाच अस्वस्थ झाला होता,’ असे हॉटेल व्यवस्थापक तेलमोरे सांगतात. सकाळी सव्वासातच्या सुमारास कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी सुलेमानला दूरध्वनी करून ती माहिती दिली. त्यावेळी सुलेमान चांगलाच सैरभैर झाला होता, अशी माहिती त्याच्या रूमबॉयने दिली.

पुढे वाचा, मीडियासे बचाओ..