आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबची फाशी: नागपुरात कडेकाेट बंदाेबस्त, शीघ्र कृतीदल तैनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूबचा भाऊ सुलेमान मेमन बुधवारी नागपुरात दाखल झाला, त्यावेळी प्रसार माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याला धावपळ करावी लागली. - Divya Marathi
याकूबचा भाऊ सुलेमान मेमन बुधवारी नागपुरात दाखल झाला, त्यावेळी प्रसार माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याला धावपळ करावी लागली.
नागपूर - १९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या याकूब अब्दुल रझाक मेमन याला गुरुवारी नागपूर कारागृहात पहाटे सहाच्या सुमारास (सूर्योदयापूर्वी) फाशी देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहर व परिसरात कडेकाेट पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला असून कारागृहाच्या पाचशे मीटर अंतरात कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू करण्यात अाली
अाहे. पत्रकारांनाही कारागृहापासून लांब राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कारागृहाचे परिसर सिल करण्यात आले. अनावश्यक व्यक्तींना कारागृहाच्या प्रवेशद्वारावरुन परत पाठविण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहा बॉम्बशोध आणि नाशक पथक आणि श्वानपथक दाखल झाले.या पथकांनी कारागृहाचा सर्व परिसर पिंजूर काढला. कारागृहाच्या सभोवतालच्या रस्त्यांवर कोणतीही वाहने उभी राहू नये म्हणून वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कारागृहाच्या समारच असलेल्या नागपूर-हैदराबाद या महामार्गावरुन ठिकठिकाणी बॅरिकेट्स लाऊन वाहनांची गती नियंत्रित करण्यात येत आहे.

पुढे वाचा, भाऊ सुलेमान, उस्मान दुपारपासून कारागृहातच