आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Hanging: Yakub Property To Wife, Daughter And Brother

पत्नी, मुलगी, भावाला याकूबची मालमत्ता - फाशीच्या अादल्या रात्री तयार केले मृत्युपत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: याकूब मेमन आणि त्याची पत्नी रहीना - Divya Marathi
फाइल फोटो: याकूब मेमन आणि त्याची पत्नी रहीना
नागपूर - अतिरेकी याकूब मेमन याला गुरुवारी पहाटे नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली. त्यापूर्वी बुधवारी रात्री त्याने कारागृहातील अधिकारी आणि वकिलांसमक्ष मृत्युपत्र लिहून ठेवले हाेते. त्यानुसार, याकूबच्या नावावर असलेल्या संपत्तीचे पत्नी राहिना मेमन, मुलगी जुबैदा मेमन आणि मोठा भाऊ सुलेमान यांच्यात समान वाटप करण्याचे नमूद केलेले अाहे.

सर्वोच्च न्यायालयाने ‘डेथ वॉरंट’ला स्थगिती देण्याची मागणी फेटाळल्यानंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि तुरुंग विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी बुधवारी याकूबला बाेलावून फाशी देण्यात येणार असल्याची माहिती दिली हाेती. त्या वेळी याकूबला त्याच्या अंतिम इच्छेविषयी विचारण्यात आले, परंतु त्याने इच्छा सांगितली नाही. भाऊ सुलेमान याला अापली पत्नी राहिना आणि मुलगी जुबैदा यांची काळजी घेण्यास सांगितले हाेते. त्यानंतर कारागृह प्रशासने मृत्युपत्र लिहिण्यासाठी याकूबला एक कागद दिला. त्यावर याकूबने लिहिले की, ‘अापल्या नावावर असलेली संपत्ती किंवा त्याला वडिलोपार्जित संपत्तीतून मिळणारा हिस्सा आणि इतर संपत्तीचे पत्नी राहिना, मुलगी जुबैदा आणि भाऊ सुलेमान यांच्यात समप्रमाणात वाटप करण्यात यावे.’ याकूबच्या या मृत्युपत्रावर कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई आणि अॅड. अनिल गेडाम यांची स्वाक्षरी असल्याची माहिती कारागृहाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

साडेसहा हजार भावाकडे
याकूब २००७ पासून कारागृहातील फाशी यार्डमध्ये बंद आहे. तेव्हापासून याकूबच्या खर्चासाठी कुटुंबीयांनी अनेकदा मनिऑर्डर पाठवली. त्याला आजवर मिळालेल्या मनिऑर्डरपैकी ६ हजार ५०० रुपये शिल्लक होते. हे पैसे कारागृह विभागाने याकूबचा मोठा भाऊ सुलेमानच्या ताब्यात दिले अाहेत.

पुढे वाचा... शवविच्छेदनाचे केले शूटिंग