आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबला ना चिंता, ना गुन्ह्याची खंत पत्नी, मुलगी, परिवाराने घेतली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन फाशी टाळण्यासाठी त्याच्या वकिलांमार्फत दररोज नवीन याचिका दाखल करत अाहे. दुसरीकडे, त्याच्या परिवारातील सदस्यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच आहे. गुरुवारी त्याची पत्नी राहिना, मुलगी झुबेदा मेमन, भाऊ राहिल मेमन, मेहुणी रिझाना आणि मेहुणा साहिल यांनी आज सकाळी ९.३० वाजता याकूबची नागपूर कारागृहात भेट घेतली. या वेळी त्यांनी याकुबशी तीन मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली. याकूबला फाशी होणार म्हणून त्याच्या परिवारातील सदस्य चिंतेत होते. परंतु याकूब हा निर्विघ्न चेहऱ्याने सर्व ऐकत होता. त्याच्या बोलण्यातूनही मरण्याची चिंता नाही किंवा गुन्ह्याची खंतही जाणवत नव्हती, अशी माहिती कारागृहाच्या मुलाखत कक्षातील एका शिपायाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

फाशी टळणार नाहीच : मुख्यमंत्री
‘याकूब मेमनने राज्यपालांकडे दया याचिका दाखल असल्याने त्याची फाशी १४ दिवस टळल्याच्या वृत्ताचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. याकूबला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार असून ती टळणार नाही,’ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या अादेशानुसार टाडा कोर्टाने याकूबच्या फाशीसाठी ३० जुलै तारीख नक्की केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच याकूबला व त्याच्या कुटुंबीयांना शिक्षेबाबत १५ दिवस अगोदर फाशीबाबत कळविण्यात अाले अाहे.