आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memon Hanged After 22 Years, Buried Along Father Kabar

याकूब मेमनला २२ वर्षांनी फाशी, वडिलांच्या कबरीच्या बाजूलाच दफन करण्‍यात आले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/ मुंबई / नवी दिल्ली - रात्रभर कायदेशीर काथ्याकूट चालल्यानंतर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा दोषी याकूब मेमनला त्याच्या ५४ व्या वाढदिवशीच नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात गुरुवारी सकाळी ७ वाजता फासावर लटकवले. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात मुंबईच्या मरीन लाइन्स कब्रस्तानात वडिलांच्या कबरीच्या बाजूलाच त्याला दफन केले.

मुंबईतील १२ मार्च १९९३ रोजीच्या बॉम्बस्फोट मालिकेचा याकूब मास्टर माइंड होता. त्याला फाशी दिल्याने शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मुंबईच्या अनेक भागांत जमावबंदी लागू करून ४०० जणांना अटक केली होती. त्याच्या मृतदेहाची छायाचित्रे किंवा व्हिडिओ चित्रफीत बनवण्यास बंदी होती. त्याचा जनाजाही काढला नाही. जवळच्या नातेवाइकांनाच कब्रस्तानात येण्याची परवानगी होती. मात्र, मृतदेह घेऊन त्याचा भाऊ सुलेमान व उस्मान माहीमच्या घरी पोहोचताच तेथे लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

पुढे वाचा... तिकडे सुनावणी, इकडे तयारी