आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील याकूबची फाशी ठरणार ‘बेंच मार्क’, नवीन दिशानिर्देशानुसार पहिली फाशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या नवीन दिशानिर्देशांनुसार १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील एकमेव फाशीचा गुन्हेगार याकूब अब्दुल रझाक मेमन याला फासावर लटकविण्यात आले. नवीन नियमानुसार देण्यात आलेली ही पहिलीच फाशी असल्याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ ला राबविण्यात आलेली फाशी प्रक्रिया इतरांसाठी ‘बेंच मार्क’ ठरणार आहे.

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या पंधरा जणांच्या अपीलावर सुनावणी करताना जानेवारी २०१४ मध्ये तत्कालिन सरन्यायाधीश पी. सथाशिवम, न्या. रंजन गगोई आणि न्या. शिव कीर्ती सिंग यांच्या पूर्ण पीठाने फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसंदर्भात नवीन दिशानिर्देश जारी केले होते. जुन्या दिशानिर्देशानुसार शेवटची फाशी २००१ साली भारतीय संसदेवर हल्ला करण्याच्या प्रकरणातील गुन्हेगार अफजल गुरु याला फेब्रुवारी २०१३ रोजी दिल्लीतील तिहाड कारागृहात फाशी देण्यात आली. अफजल गुरुला फासावर लटविण्यापूर्वी त्याच्या परिवाराला माहिती दिली नसल्याने हे प्रकरण बरेच गाजले होते. त्यानंतर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पंधरा याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आल्या. त्यापैकी १३ जणांची फाशीची शिक्षा पी. सथाशिवम यांच्या पूर्णपीठाने जन्मठेपेत परावर्तीत केली आणि दोघांचीच फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

त्या प्रकरणांत अंतिम निकाल देताना न्यायालयाने फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नवीन दिशानिर्देश जारी केले होते. या नवीन दिशानिर्देशानुसार पहिली फाशी ३० जुलै २०१५ रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात याकूब मेमनला देण्यात आली. त्यामुळे यापुढे भारतात कुठेही फाशी द्यावयाची झाल्यास नागपूर मध्यवर्ती कारागृहातील याकूबच्या फाशी प्रक्रिया डोळ्यापुढे ठेऊन कार्यवाही करावी लागेल.

पुढे वाचा, भारतात पहिल्यांदाच फाशीनंतर शवविच्छेदन