आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुलत भावाने घेतली याकूब मेमनची तुरुंगात भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेमनची त्याचा चुलतभाऊ उस्मान मेमनने सोमवारी भेट घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याचा दया अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर याकूबने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली असून त्या याचिकेवर उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता आहे. याकूबला ३० जुलै रोजी फाशी दिली जाऊ शकते. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तशी तयारी सुरू असल्याची माहिती आहे.

सोमवारी याकूबची पत्नी व मुलगी भेटण्यासाठी नागपुरात येणार असल्याची माहिती होती. परंतु, याकूबची पत्नी आणि मुलीऐवजी त्याचा चुलतभाऊ उस्मान मेमन हा सकाळी ११ वाजता नागपूर कारागृहात दाखल झाला. सामान्य कैद्यांसाठी असणाऱ्या मुलाखत कक्षाऐवजी त्यांची कारागृहाच्या दुसऱ्या कक्षात भेट ठेवण्यात झाली. या वेळी त्यांनी जवळपास ३० मिनिटे चर्चा केली.
बातम्या आणखी आहेत...