आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memon Talk To Jail Guard Before Death Penalty

मृत्‍यूपूर्वी मुलीला भेटण्‍याची इच्‍छा; फोनवर साधला संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर – 1993 मध्‍ये मुंबईमध्‍ये झालेल्‍या साखळी बॉम्‍बस्‍फोटातील सिद्धदोष आरोपी याकूब मेमनला आज (गुरुवार) सकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी फासी दिली गेली. पण, फाशी टाळण्‍यासाठी याकूबच्‍या कुटुंबाकडून शेवटच्‍या क्षणापर्यंत प्रयत्‍न केले. आता आपण वाचणार नाही, असे त्‍याला कळून चुकले होते. त्‍यामुळेच फाशीच्‍या पूर्व दिवशी बुधवारी तो खूप अस्‍वस्‍थ झाला. मुलीला भेटण्‍याची त्‍याची शेवटची इच्‍छा होती.
भेट नाही; पण फोनवरून बोलला
याकुबची मुलगी झुबेदा हिला कारागृहात आणणे शक्‍य नव्‍हते. त्‍यामुळे त्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्‍यासाठी तरुंग अधीक्षकांनी तिला फोनवरून संपर्क साधला आणि त्या दोघांचे बोलणे घडवून आणलं.
मुलीला भेटण्‍याची इच्‍छा; जेवणही केले नाही
मरणापूर्वी आपल्‍या मुलीला भेटण्‍याची याकूबची इच्‍छा होती. नागपूर कारागृहातील एका सुरक्षा रक्षकाला त्‍याने या बाबत सांगितले. एका इंग्रजी वृत्‍तपत्रानुसार, या सुरक्षा रक्षकाला बुधवारी याकूबच्‍या सेलजवळ तैनात करण्‍यात आले होते. आपल्‍या फाशीचे राजकारण होत आहे, असे याकूब त्‍याला बोलला होता. त्‍याला हेही माहिती होते की त्‍याची फाशी अटळ आहे. एरवी शांत, संयमी असणारा याकूब फाशीच्‍या वृत्‍तामुळे अवस्‍थ झाला होता. सहसा तो कारागृहातील कुणाशी बोलत नसे. मात्र, मागील काही दिवसांपासून तो सुप्रीम कोर्टातील घडामोडीची अपडेट घेत होता. याकूबला बुधवारी नाष्‍ट्यात उपमा दिला होता. जेवणामध्‍ये त्‍याला दोन पोळ्या, दाळ, भात आणि मिक्‍स व्‍हेज भाजी दिली गेली होती. मात्र, त्‍याने जेवण केले नाही.
भाऊ आला होता नागपूर कारागृहात
याकूबला फाशीपूर्वी भेटता यावे, यासाठी त्‍याचा भाऊ सुलेमान त्‍याला भेटण्‍यासाठी कारागृहात होता. मृत्‍यूपूर्वी याकूब आपल्‍या मुलीला भेटण्‍याची त्‍याची इच्‍छा होती. पण, परवानगी नाकारली कारण मागील आठवड्यातच तो मुलगी आणि पत्‍नीला भेटला होता. याकूबला भेटण्‍यासाठी आलेला भावाने मीडियाशी बोलणे टाळले.