आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात कुणाला दिली पहिली फाशीची शिक्षा ? आता याकूब नंतर कोण ? वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
नागपूर इंग्रज राजवटीत सन १८६४ मध्‍ये स्‍थापन झालेल्‍या नागपूर कारागृहाममध्‍ये १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब अब्दूल रझाक मेमन याला 30 जुलैला फाशी दिली जाणार आहे. येथे आतापर्यंत एकूण 23 आरोपींना फाशी दिली असून, याकूब हा 24 वा ठरणार आहे. दरम्‍यान, स्‍वतंत्र भारतातातील पहिला मृत्‍यूरदंडसुद्धा २५ ऑगस्ट १९५० रोजी सकाळी 7 वाजता नागपूर कारागृहातच दिला गेला होता. त्‍यानंतर ५ नोव्हेंबर १९८४ पर्यंत या ठिकाणी एकूण 23 आरोपींना फासावर लटकवण्‍यात आले. आता याकूबला याच ठिकाणी मृत्‍यूदंड दिला जाणार आहे. त्‍यानंतर बलात्‍कार आणि खून प्रकरणातील आरोपी वसंता दुपारे याचा नंबर लागू शकतो. याच करागृहात त्‍याला ठेवलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्‍याची याचिका फेटाळली आहे. त्याने सध्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला.
पुढील स्‍लाइडवर वाचा आतापर्यंत नागपुरातीत फाशी दिलेल्‍या आरोपींची माहिती