आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई ब्लास्ट: याकूब मेमनच्या फाशीवर 21 जुलैला निर्णय; जल्लाद नागपुरात दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर कारागृहाचा एरिअल फोटो आणि इस्‍नेट याकूब - Divya Marathi
नागपूर कारागृहाचा एरिअल फोटो आणि इस्‍नेट याकूब
नागपूर - वर्ष 2007 मध्‍ये स्पेशल टाडा कोर्टाने याकूब मेमनला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्‍यानंतर त्‍याने उच्‍च न्‍यायालय, सर्वोच्‍च न्‍यायालय आणि राष्ट्रपतींकडे दाद मागितली होती. सध्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयात त्‍याची याचिका प्रलंबित आहे. त्‍यावर 21 जुलैला सुनावणी होणार आहे. न्‍यायालयाच्‍या निकालानंतरच याकूबच्‍या मृत्‍यूदंडावर निर्णय होणार आहे. दरम्‍यान, याकूबला मृत्‍यूदंड देण्‍यावर राज्‍य सरकार ठाम आहे. त्‍या अनुषंगाने पुण्‍यावरून नागपूरला जल्‍लाद पोहोचला आहे.
फाशी यार्डात एकूण 16 कैदी
याकूबला नागपूर येथील फासी यार्डात ठेवलेले आहे. या ठिकाणीपासून फासी कक्ष हा हाकेच्‍या अंतरावर आहे. याकूबसह‍ या यार्डामध्‍ये एकूण 16 कैदी असून, यात एका महिला कैद्याचा समावेश आहे.
वाढदिवशीच याकूबला मृत्‍यूदंड ?
मुंबईमध्‍ये वर्ष 1993 मध्‍ये झालेल्‍या सीरियल ब्लास्टमधील आरोपी याकूब मेमनचा जन्‍म 30 जुलै 1962 ला मुंबई झाला होता. योगायोगाने 30 जुलै हीच त्‍याच्‍या मृत्‍यूदंडाची तारीख निश्वित केली गेली. या दिवशी त्‍याला फाशी फासावर लटकवले तर वाढदिवसाच्‍या दिवशीच त्‍याला मृत्‍यू होणार आहे.
येरवाड्यातही केली तयारी
सरकारने नागपूरच्‍या सेंट्रल जेलसोबत येरवाड्याच्‍या कारागृहातही फाशीची तयारी केली आहे. नागपूर सेंट्रल जेलचे जेलर योगेश देसाई आणि स्पेशल पोलिस ब्रँचचे प्रमुख विजय पवार यांनी याला दुजोरा दिला. नागपूरच्‍या फासी कक्षावर टीनशेड टाकण्‍यासाठी जेल प्रशासनाने राज्‍य सरकारकडे 2 लाख 30 हजार रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. या ठिकाणी 50 x 50 फुटाच्‍या मोकळी जागा म्‍हणजे फाशी कक्ष आहे. तिथे ओटा असून, आठ फूट लोखंडी अँगल लावलेला आहे. चहूबाजूने सुरक्षा भिंत आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा नागपूर जेल आणि याकबूचे निवडक फोटो