आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमनचा फैसला उद्या, मुलगी म्‍हणाला माफ करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर कारागृहाबाहेर असलेली सुरक्षा आणि इन्‍सेट याकूब - Divya Marathi
नागपूर कारागृहाबाहेर असलेली सुरक्षा आणि इन्‍सेट याकूब
नवी दिल्‍ली - याकूब मेमनच्‍या याचिकेवर आज (सोमवार) सर्वोच्‍च न्‍यायायात सुनावणी झाली. मात्र, वेळेत युक्‍तीवाद झाला नसल्‍याने तिचा अंतिम निर्णय उद्यावर (मंगलवार) ढकलण्‍यात आला. टाडा कोर्टाने याकूबला फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र, ती नियमानुसार नसल्‍याचा दावा याकूबने केला. शिवाय या विरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिकाही दाखल केली. याकूबला 30 जुलै रोजी फाशी होणार आहे. मात्र, त्‍याला फाशीऐवजी त्‍याला जन्‍मठेप द्यावी, यासाठी याकूबच्‍या कुटुंबांनी जोरकसपणे प्रयत्‍न सुरू केले आहेत. आपल्‍या वडिलांना माफी द्यावी अशी मागणी याकूबची 21 वर्षीय मुलगी जुबैदा हिनेही केली.
पुढील स्‍लाइडवर वाचा फाशी यार्डाला लावणार लोखंडी कवच....