आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबसाठी जल्लाद दाखल, ३० जुलैपूर्वीच फाशी देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर लटकवण्याची तयारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंतिम टप्प्यात अाली अाहे. त्यासाठी पुणे येथील येरवडा कारागृहातील जल्लाद नागपुरात दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान, याकूबला ३० जुलै राेजी फासावर लटकवणार असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्याअाधीच शिक्षेची कार्यवाही पूर्ण हाेऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

याबाबत महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, ‘दहा दिवसांपूर्वी नागपूर कारागृहाचे एक वरिष्ठ तुरुंगाधिकारी दिल्ली येथील गृह विभागाकडे याकुब मेमनची फाइल घेऊन गेले होते. गृह विभागाने याकूब मेमनच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर नागपूर कारागृहात याकूबला फासावर लटकवण्याची तयारी केली जात अाहे. जल्लादाची रंगीत तालीमही सुरू झाली आहे. सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली असून ३० जुलैपूर्वीच याकूबला फासावर लटकवण्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर याकूब मेमन याच्या कोठडीभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

या वृत्तासंदर्भात महाराष्ट्र कारागृह विभागाच्या प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. नागपूर कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र काहीही बाेलण्यास नकार दिला.
उच्चशिक्षित असूनही भावामुळे दाऊदच्या गँगमध्ये सहभागी
इंग्रजी, राज्यशास्त्रात एम.ए.
याकूब मेमन २००७ पासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती त्याच्या दया अर्जावर निर्णय घेईपर्यंत त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून (इग्नू) इंग्रजी आणि राज्यशास्त्र विषयात एम.ए. ची पदवी मिळवली. स्फाेटाच्या कटात सहभागी हाेण्यापूर्वीच ताे ‘सीए’ परीक्षेतही उत्तीर्ण झाला हाेता.
१९८४ मध्ये नागपुरात शेवटची फाशी
स्वतंत्र भारतातातील पहिला मृत्युदंड २५ ऑगस्ट १९५० रोजी सकाळी ७ वाजता नागपूर कारागृहातच दिला गेला होता. त्यानंतर ५ नोव्हेंबर १९८४ पर्यंत या ठिकाणी एकूण २३ आरोपींना फासावर लटकवण्यात आले. आता याकूबला याच ठिकाणी मृत्युदंड दिला जाणार आहे. त्यानंतर लहान मुलावर बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी वसंता दुपारे याचाही क्रमांक लागू शकतो, अशी चर्चा आहे.
दयेस पात्र नाही याकूब
टाडा कोर्टाने याकूबला २००७ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. यानंतर याकूबने सुप्रीम कोर्टाकडे अपील केले. राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. राष्ट्रपतींनीही ती फेटाळली. त्यामुळे त्याला काेणत्याही क्षणी फाशी हाेईल.
कोण आहे याकूब ?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू साथीदार असलेल्या टायगर मेमनचा धाकटा भाऊ याकूब
याकूब हा मेमन कुटुंबीयांतील एकमेव उच्चशिक्षित व्यक्ती. ‘सीए’ परीक्षेत यश
भाऊ टायगर व डॉन दाऊदमुळे याकूब गुन्हेगारीकडे वळला
१२ मार्च १९९३ राेजी मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या कटात छाेटा शकील व टायगरसाेबत याकूब सहभागी
स्फाेटानंतर दाऊद, छोटा शकील, टायगर मेमन पाकिस्तानात पळून गेले. पुढे या खटल्यात याकूब दोषी आढळला.
स्फोटाचा कट रचणे, त्यासाठी पैसे पुरवणे, दहशतवाद्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था करणे, पाकिस्तानात ट्रेनिंगची व्यवस्था करणे, पाकिस्तानात जाणे-येण्यासाठी तिकिटे काढून देणे, स्फोटासाठी वाहने पुरवणे, अवैध शस्त्र बाळगणे अादी अाराेप याकूबवर अाहेत.
नेत्यांची मुक्ताफळे : म्हणे इतकी घाई कशासाठी?
कोर्टाने २००७ मध्येच फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात याकूबने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण, ही याचिका फेटाळल्याने त्याने राष्ट्रपतींकडेही दाद मागितली होती. त्यांनीही दयेचा अर्ज फेटाळल्यामुळे आता याकूबला फाशी होणार हे निश्चित. पण, त्यासाठी इतकी घाई कशाला ? जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत फाशीची कारवाई करणे चुकीचे आहे.
माजीद मेमन, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व राष्ट्रवादीचे खासदार
कसाब, अफझल गुरूला फाशी देताना अाघाडी सरकारने गाेपनीयता पाळली हाेती. मात्र, युती सरकारने याकूब मेमनच्या फाशीची तारीख आधीच जाहीर केली. एका विशिष्ट धर्माला बदनाम करण्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे. मुळात याकूबची पुनर्विचार याचिका अजून सुप्रीम कोर्टात आहे, त्यावर निर्णय हाेण्यापूर्वी सरकार त्याला कशी काय शिक्षा देऊ शकते?
अबू अाझमी, अामदार, समाजवादी पक्ष
बातम्या आणखी आहेत...