आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलर चरख्याद्वारे सूतनिर्मिती, राज्यात पहिला प्रकल्प अमरावतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी ‘सोलर चरख्या’ द्वारे सूत काढण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे. विशेषत: कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये चरख्याद्वारे सूत उत्पादन करून लाभार्थी महिलांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अमरावती जिल्ह्यात सुरू केला आहे. शासकीय योजनेच्या माध्यमातून अमरावती येथे सुरू झालेला हा देशातील पहिलाच मोठा प्रकल्प असल्याचे जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. या सोलर चरख्यावर किमान आठ तास काम करून सुताचे उत्पादन केल्यास प्रत्येक महिलेला १५० ते २०० रुपये प्रती दिवस एवढे आर्थिक उत्पन्न मिळत असल्याचेही चेचरे यांनी सांगितले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग मिळाला आहे. विशेषत: कापूस उत्पादक पट्ट्यात सोलर चरख्याद्वारे सूतनिर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला असल्याचे अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पाच्या प्रगतीवरून दिसून येत आहे.
Àप्रत्येक गावातूनदहा याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील २२ गावांतून एकूण २२० अनुसूचित जातीतील बीपीएल महिलांची निवड करण्यात आली आहे.

Àमहाराष्ट्रराज्यखादी ग्रामोद्योग मंडळाच्या विशेष घटक योजनेतून प्रत्येक महिलेस राष्ट्रीयकृत बँकेकडून रु. ५० हजारांचे कर्ज आणि त्यावर मंडळाकडून रु. १० हजारांचे अनुदान देण्यात आले.

Àपहिल्या टप्प्यात बँकांकडून ६० महिलांचे कर्ज मंजूर आणि वाटप करण्यात आले.
Àपुसदा(तालुका-अमरावती ), खोलापूर ( तालुका-भातकुली), दिघी कोल्हे निंबा ( तालुका-चांदुर रेल्वे ) आणि सुरळी उदापूर (तालुका - वरुड) या ठिकाणी सोलर चरखा केंद्र कार्यान्वित झाले आहेत.

-बँकांकडून पंतप्रधान मुद्रा योजनेतून हे सर्व कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात आहेत.
- एकूण २२ गटांतील २२० महिलांच्या सोलर चरख्यासाठी कच्या मालाचा पुरवठा आणि तयार मालाच्या विक्रीसाठी १० महिलांचा स्वतंत्र तेविसावा गट कार्यरत आहे.
- आणखी ९० चरख्यांचे केंद्रे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या ६० चरख्यांमधून प्रती महिना हजार किलो सुताचे उत्पादन होत आहे.
-आणखी ९० केंद्रे सुरू झाल्यास सुताचे उत्पादन १० हजार किलो प्रती महिना उत्पादन होणार आहे.
- एक लाख मीटर कापड तयार होऊ शकेल एवढी क्षमता या सोलर चरखा प्रकल्पामध्ये आहे.
- प्रत्येक महिलेने किमान तास या सोलर चरख्यावर काम केल्यास किमान रु. १५० ते २०० उत्पन्न मिळत आहे.