आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: चिमुकलीचा खून, मामास दुहेरी फाशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या चुलत मामास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावली. शत्रुघ्न बबन मसराम (२१, रा. झटाळा, ता. घाटंजी) असे अाराेपीचे नाव अाहे.

शत्रुघ्न याने चिमुकलीशी गोड बोलून तिला अंगणवाडीत नेले हाेते. तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारल्याचे नातेवाइकांना आढळून आले. या वेळी तो दारूच्या नशेत तेथेच पडलेला हाेता. नातेवाइकांनी तत्काळ मुलीला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शत्रुघ्न याच्या अंगावर रक्त असल्याने त्याची डीएनए टेस्ट करण्यात आली. तसेच न्यायप्रविष्ट करण्यात आले. सत्र न्यायाधीश ए. सी. चाफले यांनी १३ साक्षी-पुरावे तपासले. मुलीचे नातेवाईक, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. शत्रुघ्न याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला दुहेरी जन्मठेपेसह दुहेरी फाशी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.