आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: पालकमंत्र्यांच्या घराला दारुच्या बाटल्यांचे तोरण बांधणार्‍यांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- यवतमाळ जिल्हा दारुबंदी व्हावा, यासाठी मागील 3 वर्षांपासून सातत्याने लढा देणार्‍या स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवारी) सकाळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराला दारुच्या बाटल्यांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा दारुबंदी करा, या मागणीसाठी स्वामिनीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मदन येरावार यांच्या घराबाहेर पोहोचले होते. मदन येरावार यांच्या घराला दारुच्या बाटल्यांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला. प्रचंड घोषणाबाजी केली. दारुच्या बाटल्या फोडून रोष व्यक्त केला. स्वामिनीचे मुख्य संजोजक महेश पवार, कळमचे संयोजक मनीषा काटे, घाटंजीचे संयोजक मनोज राठोड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष विश्वास निकम, प्रशांत मस्के लता चौधरी, सुषमा गाढवे, राजू राऊत यांना वडगाव पोलिसांनी अटक केली.
 
सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार, महामार्गालगतची दारुदुकाने बंद झाली आहे. परंतु यवतमाळचे पालकमंत्री दारु विक्रेत्यांची  पाठराखण करत असतील तर जिल्हा दारुमुक्त कसा होईल? असा सवाल संयोजक महेश पवार यांनी उपस्थित केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचे फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...