आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांना तुरीची भेट, \'राष्ट्रवादी\'च्या आमदारांनी जाळला शेतकरी विरोधी जीआर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शासनाने तुर उत्पादक शेतकऱ्यांवर अविश्वास दाखल्याने सरकारच्या जीआरची होळी करतांना आमदार ख्वाजा बेग, बाजार समितीचे सभापती राजु पाटील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेन्द्र नालमवार. - Divya Marathi
शासनाने तुर उत्पादक शेतकऱ्यांवर अविश्वास दाखल्याने सरकारच्या जीआरची होळी करतांना आमदार ख्वाजा बेग, बाजार समितीचे सभापती राजु पाटील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेन्द्र नालमवार.
आर्णी (यवतमाळ) - शासनाच्या चुकीच्या धोरना विरोधात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग यांनी महाराष्ट्र दिना निमीत्त यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तहसिदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुर भेट दिली आहे. तसेच आमदार बेग यांनी शेतकऱ्यांवर अविश्वास दाखवणाऱ्या जीआरची होळी केली. 
 
सोमवारी राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. मात्र शेतकरी त्रस्त आहे, असे म्हणत आमदार बेग यांनी सरकारचा निषेध केला.ते म्हणाले,  शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने तूरीचे उत्पादन केले, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या तुरीला भाव आणि त्यांचे कौतूक करण्याऐवजी सरकार बारदाणा नाही म्हणत तूर खरेदी टाळत आहे. असे  सांगत राष्ट्रवादीचे आमदार बेग यांनी तहसिलदारामार्फत फडणवीसांना तूर भेट देऊन निषेध केला. 
बातम्या आणखी आहेत...