आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंड प्रवीण दिवटेची गोळ्या झाडून हत्या, यवतमाळ शहरात तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शहरातील संघटित गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय असलेल्या दिवटे टोळीचा म्होरक्या आणि माजी नगरसेवक प्रवीण दिवटे (४३) याची आठ ते दहा जणांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दरम्यान, या घटनेची माहिती शहरात पसरताच सर्वत्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या प्रकरणी दिवटे याची मुलगी सृष्टी हिने तक्रार दाखल केली आहे. यात तिने बंटी जयस्वाल, श्याम जयस्वाल, रोहित जाधव, विशाल दुबे, शत्रू आणि इतर ५ जणांनी मिळून वडिलांचा खून केल्याचे म्हटले आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास प्रवीण दिवटे आपल्या सदनिकेतून कार्यालयात आला. काही वेळानंतर आठ ते दहा जण त्याच्या कार्यालयात शिरले. त्यांनी दिवटेच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून अंदाधुंद गोळीबार केला. यात तीन गोळ्या त्याच्या पोटाच्या आरपार गेल्या. यावरच न थांबता हल्लेखोरांनी दिवटेवर तलवार, खंजीर, चाकूने हल्ला चढवला. घटनेनंतर सर्व हल्लेखोर फरार झाले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, प्रवीण दिवटेवर झालेल्या हल्ल्याची माहिती काही वेळातच शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्या घराच्या परिसरात चार ते पाच हजार तरुणांनी गर्दी केली होती. गुंठा राऊत याच्या खून खटल्यातून प्रवीण दिवटे आणि त्याच्या साथीदारांची नुकतीच निर्दोष सुटका झाली होती.
बातम्या आणखी आहेत...