आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ : बंदूक साफ करतानाच ट्रिगर दाबल्या गेला, पोलिस कर्मचारी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ : शहरातील वाघापूर परिसरात असलेल्या पोलिस शस्त्र सराव केंद्रात रायफल साफ करतांना बंदुकीतून गोळी फायर होऊन एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना सकाळी 8 घडली.
 
 या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून आरमोरी विभागात पोलिस शिपाई पदावर कार्यरत असलेले अभय कोपुलवार हे आज सकाळी एके 47 शस्त्र सरावसाठी साफ करत असताना अचानकपणे लोड असलेल्या बंदुकीतून गोळी झाडली गेली.
 
 यात अभय यांच्या हातात गंभीर दुखापत झाली आहे. ही गोळी त्याच्या हातातून आरपार गेली घटनेनंतर त्यांना लगेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी नागपूर येथे त्याना हलविण्यात आले. घटनेत बंदूक साफ करताना हलगर्जीपणा करण्यात आला असल्याचे दिसत आहे. 
बातम्या आणखी आहेत...