आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yawatmal MLA Raju Todsam Convicted In Case Of Quarrel 3 Month Punishment

आर्णीचे भाजप आमदार तोडसाम यांना तीन महिन्‍यांची शिक्षा, पद धोक्‍यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - आर्णी विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जावून राडा केला होता. दरम्‍यान, सहायक लेखापाला विलास आकोत यांची कॉलर पकडून धमकीही दिली होती. या प्रकरणी त्‍यांच्‍यावर आरोप सिद्ध झाल्‍याने त्‍यांना आज (शुक्रवार) सत्र न्यायालयाने तीन महिने कारावास आणि 10 हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली.
नेमके काय आहे प्रकरण
17 डिसेंबर 2013 रोजी राजू तोडसाम हे वीज देयकाबाबत असलेली समस्‍या घेऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पांढरकवडा उपविभागाच्या कार्यालयात गेले होते. मात्र, त्‍या ठिकाणी त्‍यांनी दुपारी जेवण करत असलेले लेखापाल विलास आकोत यांची कॉलर पकडून त्‍यांना अश्‍लील शिविगाळ केली. शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आकोत यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. केळापूरच्‍या दिवाणी व फौजदारी न्यायालयाने तक्रारदार विलास आकोत यांच्यासह 10 साक्षदाराच्या साक्ष आणि सर्व पुरावे तपासून तोडसाम यांना दोषी ठरवले.
आमदारकी धोक्‍यात ?
न्‍यायालययाच्‍या या निकालामुळे आमदार तोडसाम यांची आमदारकी धोक्‍यात आली असून, ते वरच्‍या न्‍यायालयात दाद मागणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.