आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ष २०१७ अन् २००६ कॅलेंडर ‘सेम टू सेम’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नूतन वर्ष २०१७, २००६ ची दिनदर्शिका (कॅलेंडर) अगदी सेम टू सेम आहे. दोन्ही वर्ष हुबेहुब सारखेच अर्थात २०१७ या वर्षातील प्रत्येक तारीख अन् वार हे २००६ या वर्षातील तारीख आणि वाराशी साधर्म्य ठेवणारे आहे. 
 
१९११, १९१६, १९२२, १९३३, १९३९, १९४४, १९५०, १९६१, १९६७, १९७२, १९७८, १९८९ आणि १९९५ हे वर्ष देखील २०१७ सारखेच सेम टू सेमच आहे. तसेच २०१७ या वर्षातील जानेवारी फेब्रुवारी महिना २०१२ च्या कॅलेंडरप्रमाणे सारखाच आहे. जे व्यक्ती वरीलपैकी वर्षात जन्मले असतील त्यांनी त्यांच्या जन्मतारखेचा दिवस पडताळून पाहिल्यास त्यांना निश्चितपणे प्रचिती येईल, असे मत अंकगणित तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यंदा बहुतेक सार्वजनिक सुट्या या रविवार सोडून आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची चांगलीच चंगळ राहणार आहे. नवे वर्ष आपल्याला सुट्यांच्या बाबतीत फलदायी ठरणार म्हणून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. यंदाच्या वर्षात ५३ रविवार असून एकही सार्वजनिक सुटी या दिवशी आली नाही. दोन सार्वजनिक तसेच २० शासकीय सुट्यांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्यांचा मनसोक्त लाभ घेता येईल. 

बरे यात आनंदाची बाब अशी की दोन किंवा तीन सुट्या या जोडून आल्या आहेत. त्यामुळे तर चांगलीच चंगळ राहणार आहे. अनेक सण हे शुक्रवारी किंवा सोमवारी आल्यामुळे बरेचदा दुसरा किंवा चौथा शनिवार रविवार अशा सलग तीन सुट्यांचा आनंद कर्मचाऱ्यांना उपभोगता येईल. एकुणच गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुट्यांचा योग उत्तम जुळून आला आहे. अर्थात शासकीय कर्मचाऱ्यांना १५ लांबलचक विकेण्डचा आनंद उपभोगायला मिळणार आहे. 

कॅलेंडर तोंडपाठ करण्याचा विक्रम 
शहरातीलअंकगणित तज्ज्ञ सुभाष दाभिरकर यांनी कॅलेंडर तोंडपाठ असून त्यांनी तीन हजार वर्षांचे कॅलेंडर स्मरणात ठेवले आहे. त्यांनीच २००६ २०१७ अगदी सारखेच असल्याची माहिती दिली आहे. दाभिरकर हे कोणत्याही वर्षातील तारखेचा वार अगदी क्षणात सांगतात. त्यांनी गणित शास्त्रात अनेक विक्रम केले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...