आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिनानिमित्त ५० हजार योगप्रेमी करणार उद्या पहाटे योगसाधना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - योगसाधनेची प्राचीन परंपरा राहिलेल्या अमरावती शहरात यंदा ५० हजार योगप्रेमी आंतरराष्ट्रीय योगदिनी मंगळवार २१ जून रोजी विभागीय क्रीडा संकुल, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, तसेच शहरातील विविध सभागृह मैदानांवर योगसाधना करणार आहे. गतवर्षीही अमरावतीत मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा झाला होता.
तालुका जिल्हा स्तरावर सर्व शालेय विद्यार्थी, युवक, नागरिकांमध्ये योगांद्वारे आरोग्याबाबत जागृती आवड निर्माण करून प्रचार अन् प्रचार करण्यासाठी जागतिक योग दिनी सकाळी ते या कालावधीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागद्वारे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुलात १३ जून रोजी याेगप्रसारक संस्था पतंजली, श्री श्री रविशंकर आर्ट आॅफ लिव्हिंग, बृहन्महाराष्ट्र योग परिषद तसेच विविध शाळा, महाविद्यालयांमधील योग तज्ज्ञांची सभा आयोजित करून शहरातील १३ केंद्रांवर योग प्रशिक्षण केंद्र कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.

या ठिकाणी डाॅ. सुधीर वडनेरकर, डाॅ. केचे, डाॅ. वैद्य, डाॅ. सायर, डाॅ. कालोद, डाॅ. लुंगे, नितीन बोबडे, गोविंद राऊत, वैशाली बोबडे, सुधाकर वेरुळकर, रितेश तायडे, दीपा चावडा, आर.खारोळ, कोहळे, डाॅ. मिथिलेश राठोड, डाॅ. व्ही.पराते, डाॅ. राजपूत, डाॅ. अविनाश असनारे, पिधडी, डाॅ. पी.आर.राजपूत, विश्वास जाधव, डाॅ. अरुण खोडस्कर, डाॅ. सुनील लांबडे, शुभांगी रवाळे, प्रतिभा ढोक, डाॅ. अंजली कुथे, रेखा चवाळे, डाॅ. सूर्यकांत पाटील, मोहिनी जोशी, स्मिता जोग, रणजीत देशमुख, किसन देशमुख, जयमाला देशमुख, उज्वला सावरकर, शशिकांत गायकवाड, नीलेश देशमुख, रवींद्र जोंधळेकर, वंदना पराते, रत्नमाला मनोहरे, रुईकर या योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यक्रम होणार आहे.

योग दिनाचा ३३ मिनिटांचा कार्यक्रम
सर्वप्रथम श्लोक : ओम संगच्छध्वम संवद्यध्वम, संवो मनासी जानताम्। देवाभागम् यथा पूर्वे, सज्जानाना उपासते ।। तीन मिनिटे वार्मिंग अप कवायती, १५ मिनिटे उभ्या स्थितीतील योगासने ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, बैठ्या स्थितीतील योगासने भद्रासन, शशांकासन, अर्धउष्ट्रासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन, सेतुबंध सर्वांगासन, पवन मुक्तासन, शवासन. प्राणायाम : पाच मिनिटे नाडी शोधन, भ्रामरी प्राणायाम, सहा मिनिटे शांभवी मुद्रा, डोळे बंद करून हातांची ज्ञान मुद्रा, शेवटी संकल्प.
पीडीएमसी, आयुष, योग अग्रवाल भवन, विभागीय क्रीडा संकुल मोर्शी रोड, विद्याभारती महाविद्यालय, विद्यापीठ परिसर एनएसएस काेआॅर्डिनेटर, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, योग भवन स्टेट बँक काॅलनी, राजापेठ, पाेलिस मुख्यालय, एसआरपी कॅम्प, मध्यवर्ती कारागृह परिसर, संत गाडगेबाबा समाधी मंदिर, भारतीय महाविद्यालय. श्री हव्याप्र मंडळाच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता असाध्य व्याधीवर रोगोपचार, योगाभ्यास तसेच विविध विषयांवर डाॅ. प्रफुल्ल रोंघे, डाॅ. अरुण खोडस्कर, डाॅ. सूर्यकांत पाटील, डाॅ. नांदगावकर, डाॅ. अंजली कुथे मार्गदर्शन करतील.
बातम्या आणखी आहेत...