आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाचा असाही फायदा, नागपूर कारागृहातील 136 कैद्यांची योग केल्याने शिक्षा माफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आज आंतरराष्‍ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या थाटात साजरा होत आहे. यानिमित्‍ताने राज्‍यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. याच धर्तीवर नागपूर मध्यवर्ती कारागृहातही कैद्यांनी योग प्रात्यक्षिक केले. शिवाय कारागृहातील 136 कैद्यांनी योग परीक्षा उत्तीर्ण केली, त्‍यामुळे त्यांची 3 महिन्यांची शिक्षा कमी करण्यात येणार आहे.
- येथील तब्बल 350 कैदी मागील एका वर्षांपासून योगाचे प्रशिक्षण घेत आहे.
- गेल्‍या वर्षी योगा करणाऱ्या कैद्यांची शिक्षा कमी होईल, असे जाहीर करण्यात आले होते.
- योगप्रशिक्षण घेतलेल्या कैद्यांच्या वतीने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगासन प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- यावेळी कैद्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांनाच आश्‍चर्यचकित केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राज्‍यातील विविध शहरातील योग दिनाचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...