आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग परीक्षा उत्तीर्ण कैद्यांची तीन महिन्यांची शिक्षा माफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - योगसाधना केल्याने शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती मिळते. मात्र, नागपूर कारागृहातील १७७ कैद्यांना त्यापलीकडेही योगाचा लाभ झाला आहे. योग परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांची तीन महिन्यांची शिक्षा माफ झाली आहे. नागपूर कारागृहाचे प्रभारी उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून मंगळवारी नागपूर कारागृहातही सामुहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोठ्या संख्येने कैदी सहभागी झाले होते. जवळपास साडेतीनशे कैदी मागील वर्षभरापासून िनयमित योगाभ्यास करीत असून, त्यांच्यापैकी १९० कैद्यांनी पतंजली योग समितीच्या वतीने मे महिन्यात आयोजित योग परीक्षा दिली हाेती. यात बहुतांशी कैदी उतीर्ण झाले आहेत. त्यापैकी १७७ कैद्यांची वर्षातील तीन महिन्यांची शिक्षा माफ झाली असल्याचे देसाई यांनी सांगितले. मागील वर्षी कारागृह प्रशासनाने या योजनेची घोषणा केली होती. येत्या ऑक्टोबरमध्ये दुसरी परीक्षा होणार असून, त्यालाही कैद्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...