आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाट जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा उड्डाणपुलावरून पडल्यामुळे मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - इतवारा परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी दुचाकीने वेगात निघालेले दोन अल्पवयीन युवक राजापेठ ते इर्विन उड्डाणपुलावरून खाली कोसळले. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात गुरूवारी १३ जुलैला रात्री दहा वाजता झाला. या उड्डाणपुलावर मागील आठ वर्षात शुभमचा गेलेला दहावा बळी ठरला आहे. हे दोघेही शिक्षणासाठी शहरात राहत होते. 
 
शुभम यशवंत महाजन (१७, रा. दिग्रस) असे उड्डाणपुलावरून खाली कोसळून मृत्यू झालेल्याचे तर पुष्पक वसंतराव राठोड (१७) असे जखमीचे नाव आहे. शुभम पुष्पक हे दोघे मित्र असून त्यांनी यंदाच बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. पुढील शिक्षणाशी संबधित ‘क्लासेस’ करण्यासाठीच हे दोघेही शहरात महालक्ष्मी नगरात फ्लॅटमध्ये राहत होते. दरम्यान गुरूवारी १३ जुलैला या तिघांना जेवणासाठी इतवारा भागातील हॉटेलमध्ये जायचे होते. त्यासाठीच शुभम केटीएम ड्युक दुचाकीने पुष्पकसह निघाला तर त्यांचे दोन मित्र अन्य दुचाकीने येत होते. शुभम पुष्पक असलेली दुचाकी शुभम चालवित होता. त्याची दुचाकी वेगात होती. राजापेठ ते इर्विन चौक या उड्डाणपुलावरून दुचाकीवरुन जाताना वालकट कपाउंडजवळ शुभमचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर येवून धडकली. यावेळी दुचाकीची गती सुसाट असल्याने शुभम उड्डाणपुलावरून कोसळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. मागे बसलेला पुष्पकही खाली पडला. मात्र तो खालच्या रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगावर पडल्याने, त्याला कमी मार लागला. अपघातानंतर शुभमचे दोन मित्र तिथे पोहोचले. मात्र उड्डाणपुलावर शुभमची दुचाकी त्यांना दिसली. दोन्ही मित्र खाली पडल्याचे त्यांना समजले. त्याचवेळी कोतवालीचे दोन पोलिस जात होते. त्यांनी दोघांनाही इर्विन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले, तर गंभीर जखणी पुष्पकला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणात शुभम पुष्पक यांचा मित्र सौरभ उत्तमराव मनवर (रा. दिग्रस ह. मु. रविनगर, अमरावती) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम महाजनविरुध्द स्वत:च्या मृत्यूस, पुष्पकच्या गंभीर होण्यास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अशी माहीती पोलिसांनी दिली. शुभमहोता आईचा आधार : शुभमचेवडील आई हे दोघेही शिक्षक आहेत. शुभम लहान असतानाच आई, वडील हे वेगळे राहायला लागले. त्यामुळे शुभमची आई त्याला घेवून दिग्रसला राहत होती. बारावी उत्तीर्ण करून शुभम क्लासेससाठी शहरात आला होता. दरम्यान गुरूवारी झालेल्या अपघातात शुभमचा मृत्यू झाल्याने त्याच्या आईचा आधार गेला. पुष्पकचेही वडील शिक्षकच असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. 

आणखी माहिती घेणार 
^गुरूवारीरात्री उड्डाण पुलावरून पडून शुभम महाजन नामक युवकाचा मृत्यू झाला आहे. सुसाट वेगाने दुचाकी चालवत असल्यामुळेच अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गंभीर युवकावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघाताताबाबत आणखी माहिती घेण्यात येत आहे.’’ मनीषठाकरे, ठाणेदार, कोतवाली. 

दोन्ही दुचाकी सोबत निघाल्या मात्र एक उशिरा पोहोचली 
बडनेरा मार्गावरील ज्या हॉटेलवरून हे चौघे जेवण करण्यासाठी निघाले, त्यावेळी चारही मित्र दोन दुचाकीवरून एकाचवेळी निघाले. असे असतानाही शुभमचा अपघात झाल्यानंतर जवळपास ते मिनिटानंतर त्याचे दोन मित्र दुचाकीने घटनास्थळी पोहोचले. यावरून शुभमच्या दुचाकीची गती किती सुसाट होती, हे लक्षात येते, असे पोलिसांनी सांगितले. 


 
बातम्या आणखी आहेत...