आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवेवर कोलकात्याच्या युवकाचा अपघाती मृत्यू, रहाटगावजवळ घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती-नागपूर महामार्गावरील रहाटगावजवळच्या होटेल गौरी इन समोर बुधवारी (दि. २४) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात टँकरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेल्या एका ३४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेला युवक हा मुळचा कोलकाता येथील रहिवासी असून सद्या तो शहरात वास्तव्याला होता.

मो. हुसेन लस्कर ऊर्फ मोंटू मास्तर (३४ रा. संतोषीनगर गल्ली क्रमांक १) असे मृतकाचे नाव आहे.मो. हुसेन हे कापड कारागिर म्हणून नांदगाव पेठ परिसरातील बिझी लॅन्ड मार्केटमध्ये काम करत होते. बुधवारी रात्री काम आटोपून ते आपल्या एका मित्रासमवेत दुचाकीने शहरात परत येत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा गाडगेनगर पोलिस घटनास्थळी पोहचले होते.

दीडकि.मी अंतरावर मृतदेह :
बुधवारीरात्री अपघात झाल्यानंतर मो. हुसेन त्यांचा सहकारी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. एका वाहन चालकाने दोघांनाही रुग्णालयात पोहचवण्यासाठी वाहनात घेतले. मात्र काही अंतरावर मो. हुसेनचा मृत्यू झाल्याने मृतदेह पीडीएमसी रुग्णालयाजवळ टाकून जखमीला इर्विनमध्ये पोहचवण्यात आले. दरम्यान, एका वाहनातून मृतदेह खाली टाकण्यात आल्याने सुरूवातीला काही वेळ हा खून असल्याची चर्चा सुरू होती मात्र नंतर यावर पडदा पडला.
बातम्या आणखी आहेत...