आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीच्या आत्महत्येनंतर जमावाचा ठाण्याला घेराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे - चांदूर रेल्वे स्टेशनवर मोगरा येथील ईश्वरी बबनराव थेटे (१७) नामक युवतीने धावत्या मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. मात्र घटनेला जबाबदार आरोपीला अटक झाल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने शहरात रात्री साडे अकराच्या सुमारास तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान मृतक युवतीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या ऐजाज हुसैन (२१) अभिजीत गावंडे (२०) रा. चांदूर रेल्वे यांना दोन्ही आरोपींना एलसीबीने अमरावती येथून रविवारी (दि. १८) मध्यरात्री अटक करून रेल्वे पोलिसांच्या सुपूर्द केले. या प्रकरणी दोन पत्रकारांसह १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मृतक युवतीच्या चार नातेवाईकांचा समावेश आहे. 
 
तालुक्यातील मोगरा येथील रहिवाशी बबनराव थेटे यांची १७ वर्षीय मुलगी, ईश्वरी ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असल्याने शिक्षणासाठी ती शहरातील रामनगर परिसरात भाड्याने राहत होती. तिची आई गृहिणी असून तिला एक भाऊ आहे. तो वडिलांना शेतीच्या कामात मदत करतो. घटनेच्या वेळी ईश्वरी ही मैत्रिणीसह चांदूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर बसली होती. दुपारी तीनच्या सुमारास नागपूरकडे जाणारी मालगाडी प्लॅटफाॅर्मजवळ येताच तिने गाडीखाली स्वत:ला झाेकून दिले. याबाबत बडनेरा रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. ईश्वरीच्या बॅगमध्ये मृत्यूपुर्व लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. मात्र घटना घडून काही तासांचा अवधी उलटला तरी स्थानिक पोलिस जीआरपीएफ यांचा समन्वय दिसून येत नसल्याने आरोपी फरार झाल्याचा आरोप करीत शवविच्छेदनानंतर मृतक युवतीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आरोपीच्या अटकेची मागणी करीत ४००-५०० नागरिकांच्या जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घातला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी जमावावर लाठीमार केला.
 
संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिस वाहनावर वर दगडफेक केली. यामध्ये ठाणेदार ब्रह्मदेव शेळके हे जखमी झाले. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमरावती येथून पोलिसांची अतरिक्त कुमक दंगा नियंत्रक पथक बोलावण्यात आले होते. रविवारही शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी दोन पत्रकारांसह १८ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये प्रशांत कांबळे अभिजीत तिवारी या दोन पत्रकारांसह सुरेंद्र पोकरकार, रुपेश कदम, मंगेश दांडगे, शेख अनिस शेख नजिम, शेख दोला अहमद पठाण, विक्की कलावटे, मो. अनिस मो. नूर, जीवन थेटे, मनोहर थेटे, शंकर थेटे, राजू दांडगे, भैय्या थेटे, मोरेश्वर कदम, भारतसिंग कचवे, दिलीप कचवे नीलेश भलेराव यांचा समावेश आहे. प्रशांत कांबळे अभिजीत तिवारी हे दोन पत्रकार वृत्तसंकलनासाठी पोलिस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी एसपी अभिनाश कुमार हे स्वत: उपस्थित होते. युवतीचे नातेवाईक जीवन थेटे, मनोहर थेटे, शंकर थेटे, भैया थेटे मनोहर कदम यांना अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी पोलिस अधीक्षकांनी नाकारल्याचा आरोप केला आहे. 
 
दोन आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात 
^याघटनेलाजबाबदार असलेल्या दोन आरोपींना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सत्यदेवशेळके, ठाणेदार 
जमावाला समजावताना पोलिस अधिकारी. इन्सेट-मृतक ईश्वरी.