आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पग्रस्त तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; नोकरी, जमिनीचे पैसे न मिळाल्याचे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सुपीक शेतजमीन प्रकल्पात गेली, पण त्या मोबदल्यात सरकारने नोकरी आणि पर्यायी शेतजमीन न दिल्यामुळे निराश झालेल्या अमरावती िजल्ह्यातील एका तरुणाने साेमवारी नागपूरच्या विधिमंडळाबाहेर अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत बाळकृष्ण देशमुख (३०, रा. दर्यापूर) असे या तरुणाचे नाव अाहे. महाराजबाग चौकातील झाडावर चढून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत पाेलिसांनी वेळीच त्याला राेखल्याने अनर्थ टळला.
प्रशांतच्या वडिलांच्या नावाने चार एकर शेती होती. सन २००९ मध्ये सिंचन प्रकल्पासाठी लघु पाटबंधारे िवभागाने त्यातील दोन एकर दोन गुंठे शेती सरकारने संपादित केली. त्यावेळी सरकारच्या वतीने जमिनीचा काही मोबदला आणि घरातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या अाश्वासनाची पूर्तता झाली नाही, असे प्रशांत याचे म्हणणे अाहे.
‘आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रशांत सोमवारी नागपुरात आला हाेता. त्याने आमदार बच्चू कडू व आमदार रमेश बुंदेले यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्याला भेटता आले नाही. त्यामुळे निराश झालेल्या प्रशांतने झाडावर चढून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

फोटो - सुपीक जमीन सिंचन प्रकल्पात गेली. सरकारने नाेकरीवर घेण्याचे अाश्वासन दिले, मात्र पाळले नाही. हाती पैसाही नाही... अशा एक ना अनेक कारणांनी निराश झालेल्या अमरावती जिल्ह्यातील तरुणाने साेमवारी नागपुरातील विधिमंडळाबाहेर अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाेलिसांनी त्याला वेळीच राेखले तेव्हा या तरुणाला रडू अावरले नाही.
बातम्या आणखी आहेत...