आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वहिनीचे अस्थिविसर्जन दिराचा नदीत बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वहिनीच्या अस्थिविसर्जनप्रसंगी अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चुलत दिराचा अचानक पायरीवरून पाय घसरल्याने तो नदीत बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना रविवारी (दि. १६) दुपारी दोन वाजताच्या सुमारास कौंडण्यपूर येथे वर्धा नदीत घडली.योगेश विजय खेडीकर (३४, रा. दिघोरी, नागपूर) असे मृतक युवकाचे नाव आहे. 
 
शहरातील छाबडा प्लॉटमध्ये राहणाऱ्या स्मिता सचिन खेडीकर (३५) यांचा १४ जुलैला मृत्यू झाला होता. दरम्यान रविवारी त्यांच्या अस्थि विसर्जीत करण्यासाठी कुटुंबीयांसह नातेवाईक कौंडण्यपूरला गेले होते. यासाठी योगेश नागपूरवरून शहरात आले होते. आज योगेश त्यांचे इतर नातेवाईक कौंडण्यपूरला गेले. दुपारी साडेबारा वाजतापासून अस्थि विसर्जनाला सुरूवात झाली. अस्थि विसर्जीत करण्यासाठी नदीत आणल्या. त्याचवेळी योगेश अंघोळ करण्यासाठी नदीत जाण्यास निघाले, त्यावेळी पायरीवरून पाय घसरुन ते थेट नदीत गेले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरड केली, मात्र वेळेवर कोणीही वाचवण्यासाठी आले नाही. नदीला सद्या भरपूर पाणी आहे. दरम्यान काही वेळानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने कुऱ्हा आराेग्य केंद्रात तेथून इर्विनमध्ये आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. तीन दिवसांत खेडीकर कुटूंबातील दोन जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
 
...तर माझा भाऊ वाचला असता 
योगेश नदीत बुडाला त्यावेळी आम्ही त्याच्या मदतीसाठी आरडाअोरड केली. मात्र वेळीच कोणीही आले नाही. या ठिकाणी सूचना फलक नाही, संकटकाळात मदतीसाठी पट्टीचे पोहणाऱ्यांचा किंवा संबधित पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक नाही. पायरीवर मोठ्या प्रमाणात शेवाळ साचलेे आहे. आज वेळीच मदत मिळाली असती तर माझा भाऊ वाचला असता,अशी खंत अमित खेडीकर यांनी व्यक्त केली. 

 
बातम्या आणखी आहेत...