आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपकी क्रीडा अदालत’मध्ये खेळाडूंच्या समस्यांचे होणार समाधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘खेळआरोग्यासाठी, प्रत्येक घरासाठी’ या उक्तीनुसार एशियन क्रीडा आरोग्य प्रकल्प राज्याच्या तळागाळातील खेळाडूंसाठी काम करीत असते. या प्रकल्पाचे समन्वयक डाॅ. संजय आव्हाळे यांच्या कल्पकतेतून खेळाडूंना न्याय देण्यासाठी आॅनलाईन कार्यक्रम “आपकी क्रीडा अदालत’ लवकरच राज्यभरात राबविला जाणार असून यात खेळाडूंच्या समस्यांचे समाधान केले जाणार आहे.

आजवर खेळाडूंना न्याय देण्यासाठी कोणतेही व्यासपीठ राज्यात उपलब्ध नव्हते. परंतु, आपकी क्रीडा अदालतच्या माध्यमातून अन्यायग्रस्त खेळाडूंच्या समस्यांना वाचा फोडली जाणार आहे. इंटरनेट तसेच व्हाॅट्स अॅपच्या माध्यमातून आणि शक्य असेल तर अॅप असलेल्या मोबाईलवरही खेळाडूंना थेट त्यांची ज्यांच्याबद्दल तक्रार आहे, त्याच्याशी संपर्क साधून दि‍ला जाणार असून ही व्यक्ती जरी इंग्रजीत संभाषण करीत असली अन् खेळाडूंना ती भाषा फारशी समजत नसली तरी काहीच हरकत नाही. खेळाडंूना जर हिंदी किंवा मराठी यापैकी एक भाषा समजत असेल तर त्यांना हे संभाषण मराठीत ऐकता येतील. खेळाडूची जर दि‍ल्ली येथील एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार असेल तर त्वरित त्याच्याशी संपर्क साधून आॅनलाईन क्रीडा अदालत सुरू होईल. यात खेळाडूला कोणत्याही दडपणाशिवाय किंवा कारकीर्द खराब होईल अशी भिती बाळगता संबंधित अधिकाऱ्याला, प्रशिक्षकाला िकंवा एखाद्या ज्येष्ठ खेळाडूला प्रश्न विचारता येतील. या प्रकरणी दोघेही आपापली बाजू मांडतील. त्यानंतर पंच मंडळ िनर्णय देईल. ही प्रक्रीया आॅनलाईन होणार असल्यामुळे यात त्वरित निर्णय िमळणार आहे.

२५तज्ज्ञांचे पथक देणार निर्णय : जुनेजाणते क्रीडातपस्वी, क्रीडा धुरंदर, क्रीडाऋषी, क्रीडा भीष्माचार्य यासारखे २५ तज्ज्ञांचे पथक खेळाडूंच्या समस्यांवर िनर्णय देणार आहेत. यासाठी अभ्यासू ज्येष्ठ क्रीडा अधिकारी वर्गाला प्रत्येक व्हाॅट्सअॅप ग्रुपवर लिंक उपलब्ध करून िदली जाणार आहे.

आॅनलाईन सिस्टिम केली विकसीत
आपकी क्रीडा अदालतवरील चर्चेसाठी आॅनलाईन सिस्टिमचा विकास करण्यात आला असून त्याद्वारे खेळाडूंना ज्या व्यक्तीबाबत समस्या आहेत त्यांच्याशी त्वरित संपर्क साधून िदला जाणार आहे. खेळाडूंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही व्यक्ती देणार असून, त्यावर अभ्यासाअंती २५ तज्ज्ञांचे पथक िनर्णय देणार आहे.
बातम्या आणखी आहेत...