आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याला अटक, नागपूर पोलिसांनी केली कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अश्लिल भाषा वापरणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वर्तकनगर पोलिसांनी वालचंद गिट्टे याच्याविरुद्ध मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला. 


वालचंद हा खासगी कंपनीत कार्यरत आहे. 16 नोव्हेंबरला त्याने शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर ट्विट केला. या‌ ट्विटची माहिती मिळताच नागपूर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी जगदीश पंचभुते यांनी नंदनवन पोलिसांत तक्रार दिली. नंदनवन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. नंदनवन पोलिसांनी मंगळवारी गिते याला अटक केली. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणात गिते याला अटक करण्यात आल्याचे नलावडे यांनी सांगितले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...