आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पीएसआयची दोघींनी पकडली कॉलर; एक्स्प्रेस हायवेलगतची घटना,तिघांना केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुपरएक्सप्रेस हायवेलगतच्या खदान परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी एक मुलगा दोन मुली बोलत असताना त्यांना आयुक्तालयातील महिला पीएसआय शीतल निमजे यांनी हटकले असता त्या मुलींनी निमजे यांना अश्लील शिवीगाळ करून कॉलर पकडली तसेच पथकातील एका पोलिसाला मुलींसोबत असलेल्या मुलाने मारहाण केली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. ही घटना सोमवारी (दि. ६) सकाळी १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास घडली. 

सुमित अरुण थोरात (२५, रा. गोपालनगर) असे अटक केलेल्या त्या मुलींसोबत असलेल्या युवकाचे नाव आहे. अटक केलेल्या दोन्ही मुली बहिणी असून त्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या मुली आहेत. पीएसआय निमजे सद्या सायबर सेलला कार्यरत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास हायवेवर गस्तीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी खदानसारख्या निर्मनुष्य ठिकाणी दोन मुली एक मुलगा त्यांना दिसले. यांनी हटकले असता त्या मुलींनी पीएसआय निमजेंसोबत वाद घालून तुम्ही आम्हाला आेळखत नाही का, आम्ही अधिकाऱ्याच्या मुली आहोत. आमचे वडीलही अधिकारी आहेत, पाहून घेतो, असे धमकावून थेट कॉलर पकडली तसेच अश्लील शिवीगाळसुध्दा केली. यावेळी या दोन्ही मुली निमजे यांच्या अंगावर आल्यामुळे पथकातील पोलिस अमोल ढेंगेकर यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला तर सुमित थोरातने अमोल यांना बुक्की, शिवीगाळही केली. या धक्कादायक प्रकारामुळे या तिघांनाही ताब्यात घेऊन निमजे त्यांचे पथक फ्रेजरपुरा पोलिसात पोहचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली. 

गुन्हा नोंदवून अटक 
गस्तीवरच्या पीएसआय निमजे यांची कॉलर पकडून शिवीगाळ करणाऱ्या दोन्ही मुलींसह युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पंजाबराव वंजारी,ठाणेदार, फ्रेजरपुरा.
बातम्या आणखी आहेत...