आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राला बाहेर काढून स्वत:फसला गाळात, शिरजगावात गणेश विसर्जनादरम्यानची घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव कसबा - घरगुती गणपती विसर्जन सुरू असतानाच पाय घसरून पाण्यात बुडत असलेल्या युवकाला वाचविण्यासाठी एका युवकाने पाण्यात उडी मारुन त्याला सुखरुप बाहेर काढले. या प्रयत्नात स्वत:मात्र तेथे असलेल्या गाळात फसून दगावल्याची हृदयद्रावक घटना घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. विशाल किशोर सातपुते (२४) असे मृतकाचे नाव असून तो गवारीपुरा येथील रहिवासी होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

मृतक विशाल हा शेजारी राहणाऱ्या रोहित गोरडे नामक युवकासह घरचा गणपती शिरवण्यासाठी परिसरातील नदीवर गेला होता. दरम्यान विसर्जन सुरू असतानाच रोहितच्या हातून कलेश पाण्यात पडला. 
 
कलेश पाण्यातून बाहेर काढण्यासाठी राेहित पुढे गेला असता, तो बुडत असल्याचे लक्षात आल्याने मृतक विशाल त्याला वाचविण्यासाठी पुढे आला. त्याने रोहितला पाण्याबाहेर काढले. मात्र गाळातून त्याला बाहेर येता आल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतक विशाल हा एलआयसीसह आठवडी बाजारात भाजीपाला विकत होता. त्याच्या पश्चात आईवडील एक बहीण आहे. सातपुते परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
बातम्या आणखी आहेत...