आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलटलेल्या ट्राॅलीखाली दबले नवजीवनाचे स्वप्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच ट्राॅलीखाली दबून दिलीप गोलूचा अंत झाला - Divya Marathi
याच ट्राॅलीखाली दबून दिलीप गोलूचा अंत झाला
अमरावती - दिलीपचे लग्न पक्के होऊन जेमतेम महिना झाला होता. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत मेळघाटात हाताला काम नाही म्हणून दिलीप सातपुड्याखाली उतरला होता. लग्नासाठी लागणारी पै पै जुळवण्यासाठी ४४ अंश तापमानामध्ये दिलीप ढोरासारखी ट्रॉली उपसत होता. लग्नाच्या स्वप्नात रंगलेल्या दिलीपला होणारे रक्ताचे पाणीही भर उन्हात गारवा निर्माण करत होते. यातच ट्रॉली उलटून दिलीप त्या खाली दबला. त्याचबरोबर त्याचीही स्वप्नही...…
 
दिलीप मानसिंग उईके (२६) आणि गोलू उर्फ रितेश बाबनू कासदेकर (२०) हे दोघेही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात असलेल्या कोयलारी (काटकुंभ) गावातील रहीवासी होते. दिलीप आणि गोलू हे दोघे मित्र. गावात हाताला काम नाही, यातच दिलीपचे लग्न एक महिन्यावर आले होते. लग्नासाठी पैसा तर लागणारच होता. त्यामुळे हे दोघेही गावातून रविवारी (दि. ९) जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथे आले होते. गुरूकुंज मोझरी येथील योगेश देशमुख यांच्या ट्रॅक्टरवर दोघेही मजूरीचे काम करत होते.
 
महीनाभर सलग काम करायचे आणि १६ मे रोजी होणाऱ्या लग्नासाठी पैसा घेऊन गावी जायचे, हे स्वप्न उराशी बाळगून उन्हातही ढोर मेहनत करत होते. मात्र या समस्त स्वप्नांवर नियतीने एका क्षणात झेप घेतली आणि सर्व संपवून टाकले. बुधवारी दुपारी दास टेकडीवरून गुरूकुंज मोझरीला येत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या ट्रॉलीत असलेल्या दिलीप आणि गोलूचा त्या खाली दबून करुन अंत झाला. या घटनेने दिलीप गोलूचे कुटूंबियांना जबर धक्का बसला आहे. एकाचवेळी गावातील दोन तरुणांचे असे आकस्मिक निधन धक्कादायक आहे. गुरूवारी दोघांच्याही पार्थीवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीपचे मध्यप्रदेशातील मुलीसोबत लग्न जुळले होते. १६ मे रोजी लग्न होणार होते.
 
बातम्या आणखी आहेत...