आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांच्या कारणावरून गोवर्धनचा खून, आरोपीची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - व्याजाचे पैसे देण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरुन गोवर्धन याने रविवारी सकाळी आरोपीला मारहाण केली होती. हिच मारहाण सायंकाळी त्याच्या जीवावर बेतली. पैशांसाठी होणारा त्रास आणि मारहाणीचा राग यामुळे गोवर्धनचा खून केल्याचे आरोपींनी सांगितले आहे. या खून प्रकरणातील तीन आरोपींना अवघ्या चार तासात अटक केली आहे. 

रिंकु त्रिवेदी खून प्रकरणातून निर्दोष सुटलेला गोवर्धन ढोले याचा भाजी मंडईत खून करण्यात आला होता. हा खून पूर्वी घडलेल्या एका खुनाचा वचपा असल्याची चर्चा होती. घटनेच्या काही तासातच तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यात अब्दुल रशीद अब्दुल गफूर,अब्दुल कादीर उर्फ सोन्या अब्दुल रशीद तसेच जाहीद उर्फ राजा अब्दुल रशीद याला ताब्यात घेतले. या आरोपींनी पोलिसांपुढे दिलेल्या कबुलीनुसार गोवर्धन हा सावकारीचा व्यवसाय करीत होता. तो रविवारी सकाळी भाजी मंडईत आला होता. त्यावेळी त्याने आरोपी राजा अब्दुल रशीद याच्यासोबत पैशाच्या कारणावरुन वाद करुन त्याला मारहाण केली होती. त्यासोबतच व्याजाच्या पैशांसोबत २० हजार रुपये सायंकाळपर्यंत तयार ठेवण्यास सांगितले. त्यानंतर गोवर्धन सायंकाळी पुन्हा त्या ठिकाणी आला. यावेळी त्याचा मुलगा जय त्याच्या सोबत होता. यावेळी पूर्वीपासून तयार असलेल्या या तीन्ही आरोपींनी गोवर्धनच्या पाठीमागून येऊन त्याच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...