आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावलीनेही सोडली नागपूरकरांची सोबत; ‘झीरो शॅडो-डे’ ला सावली आली पायाखाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- २५ मेपासून नवतपा सुरू झाला आहे. त्यामुळे जूनपर्यत उन चांगलेच तापणार आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून शुष्क उष्ण वारे राजस्थानात येतात. तिकडून ते आपल्याकडे येतात. अंग भाजून काढणारे ऊन सध्या आहे. रणरणते उन आणि रखरखते वातावरण यात स्वत:च्या आणि झाडाच्या सावलीचीच काय ती सोबत. निदान ती तरी सोडून जात नाही. पण शुक्रवार, २६ मे रोजी सावलीही सोडून गेली. तेही सूर्य ऐन डोक्यावर आलेला असताना... 

मे महिन्यात सूर्य डोक्यावर आल्याने तापदायक ठरत आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने बाहेर पडणे कठीण झाले आहे. नाजूक फुले कोमेजतात. अशावेळी सावलीने तरी साथ सोडू नये असे वाटते. पण या मे महिन्यात सावलीनेही साथ सोडली. सावलीसारखी सोबत करणारी माणसेही एक दिवस सोडून जातात. पण सावली कधी सोबत सोडत नाही. पण २६ मे रोजी सावलीने नागपूरकरांची काही काळासाठी का होईना साथ सोडली होती... 

‘झीरो शॅडो डे’ 
सावलीसाथ सोडण्याला ‘झीरो शॅडो डे’ म्हणतात. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव नागपुरकरांनी घेतला. 
बातम्या आणखी आहेत...