आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता प्रतीक्षा निकालाची: मनपा 54 तर झेडपीसाठी 65 टक्के मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात  महापालिकेसह  जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांकरिता जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या निवडणुकीदरम्यान तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. महापालिकेच्या २२ प्रभागातील ८६ जागांकरिता  ५४.२१ टक्के  तर जिल्हा परिषदेसाठी ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
दरम्यान,  महापालिकेच्या  ८७ जागांकरीता निवडणूक  लढविणाऱ्या  ६२८, जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरीता रिंगणात उतरलेल्या  ४१७  तर पंचायत समित्यांच्या ८८ जागांवर उभे असलेल्या ५३३  अशा एकूण  १,५७८ उमेदवारांचे भाग्य  आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता असून, गुरुवारी (दि.२३) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
- मनपाच्या ८७, जि.प.च्या ५९ तर १० पं.स.च्या ८८ जागांवर लढणाऱ्या १,५७८ उमेदवारांचे भाग्य आज बंदिस्त झाले.
- ३ लाख १० हजार ४५५ मतदारांनी बजावला संवैधानिक हक्क
बातम्या आणखी आहेत...