आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतीपदाचे सूत्र टिकणार की तुटणार? सभापतीपदासाठी काँग्रेस चिंतेत !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सभापतीपदाच्या नावावर अद्याप एकमत झाले नसल्याची माहिती आहे. शेवटच्या वर्षात सहा महिने राकाँ फ्रंट तर सहा महिने काँग्रेसकडे पद ठेवण्याचे सूत्र ठरले होते. मात्र, संजय खोडके हेच काँग्रेसवासी झाल्याने सभापतीपदाचे सूत्र टिकेल की तुटेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक घेतली जाणार आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीबाबत महापालिका प्रशासनाकडून विभागीय आयुक्तालयात प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सभापतीपदाची निवडणूक १० मार्च रोजी होणार आहे. महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस राकाँ फ्रंट म्हणजेच खोडके गटाने महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीपदाबाबत सूत्र निश्चित केले होते. रावसाहेब शेखावत सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला होता. महापौर-उपमहापौर पदाबाबत सूत्र टिकले, मात्र शेवटच्या वर्षात स्थायी समिती सभापतीपदाबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात धरला. संजय खोडके यांच्यासह महापालिकेतील त्यांचा गटदेखील सोबत आहे. मात्र, ज्या पक्षासोबत मनपात आघाडी केली, त्याच काँग्रेसमध्ये संजय खोडके हे प्रदेश सरचिटणीस पदावर आहेत.

गुरुवारी निवडणूक
स्थायी समिती सभापती पदासाठी गुरुवार १० मार्च रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते या निवडणुकीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील. सकाळी ११ वाजता निवडणूकक होईल. १० मार्चला तारीख निश्चित करण्यात आली आहे.