आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि. प. शाळेला पंखे अन् कपाट देऊन दिला मदतीचा हात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - एरव्हीजिल्हा परिषद शाळेचे नाव काढले तर, अनेकांच्या कपाळावर आठ्या पडू लागतात. दिवसेंदिवस इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे, परिणामी जिल्हा परिषद शाळांकडे ग्रामीण भागातील पालकही पाठ फिरवू लागले आहेत, परंतु ज्या शाळेमुळे आपण घडलो, तिचे काहीतरी देणे लागते, ही जाणीव ठेऊन मोझरी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत शैक्षणिक उठाव कार्यक्रमाअंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेला कपाट सिलिंग पंख्याची भेट दिली. यासाठी नारायण बनारसे यांनीही पुढाकार घेतला.

विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, तसेच शाळेचे कागदपत्र व्यवस्थित राहावे या उद्देशाने समितीने पुढाकार घेत हा उपक्रम राबवला. यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले. एकिकडे इंग्रजी शाळांची वाढलेली संख्या पाहता पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे दिसून येतो. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांसह पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळत असतानाच शाळेमधील विद्यार्थी संख्या कायम राहावी म्हणून शाळा समितीने उचललेल्या या पावलाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

शाळेला मिळालेल्या या मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी शाळा समितीचे अध्यक्ष गणेश भुरे, सीमा निमकर, प्रकाश गहुकर, हर्षा भुरे, समिक्षा चवने, वनमाला पाचघरे, बबिता गणेश, प्रेमानंद कांडलकर, शिल्पा खेरडे, नंदकिशोर आखरे, अर्चना होले, पद्मा बारई, प्रभा भोजने यांचे आभार मानले.

नेहमीच लाभते सहकार्य
^शाळेचीव्यवस्थापनसमिती ही विद्यार्थांच्या हिताचे निर्णय घेणारी आहे. शाळा समितीने शाळेच्या विकासासाठी केलेले सहकार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. कल्पनामोहड, मुख्याध्यापिका, जि.प. कन्या शाळा, मोझरी

शाळेच्या विकासाला केले साहाय्य
^विद्यार्थ्यांप्रतिअसलेल्याप्रेमालाच अनुसरून आपणही विद्यार्थ्यांचे पालकच आहोत, ही जाणीव ठेऊन शाळा समितीच्या प्रत्येक सदस्याने मिळून पैसे गोळा केले शाळेच्या विकासाला थोडा का होईना हातभार लावला याचे समाधान आहे. ग्रामस्थांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. गणेशभुरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.
बातम्या आणखी आहेत...