आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मधून पाहा मलकापुरात उसळलेल्या दंगलीतील दगडफेक आणि जाळपोळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - मलकापुरात सोमवारी काढण्यात आलेल्या एका मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दंगल होऊन शहरात तणाव निर्माण झाला. या वेळी दंगलग्रस्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेलेले आमदार चैनसुख संचेती, नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्यासह उपविभागीय पोलिस अधीक्षक राजेंद्र साळुंके जखमी झाले आहेत. दरम्यान, दंगल आटोक्यात येत नसल्याने मलकापूर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे.

एका गटाने सोमवारी शहरातून दुचाकी फेरी काढली होती. ही फेरी साळीपुरा भागातून जात असताना दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटांमध्ये वाद होऊन प्रचंड दगडफेक सुरू झाली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अश्रुधुराचा वापर केला. परंतु परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने हवेत गोळीबारही केला. या घटनेचे पडसाद शहरात उमटून जाळपोळ सुरू झाली. दंगा काबू पथक, जिल्हाधिकारी विजय झाडे, विशेष पोलिस दल तसेच अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासाठी मलकापुरात दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात नसल्याने कलम १४४ लागू करून संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीही मलकापूर येथे जाऊन शांततेचे आवाहन केले.

परिस्थिती नियंत्रणात : शहराच्या वेगवेगळ्या भागातील माहिती घेणे सुरू असून बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्याएेवजी चौकाचौकात घोळके जमा होत होते. दरम्यान, जमावावर नियंत्रण ठेवत असताना पोलिस तसेच काही नागरिक जखमी झाले. अद्याप जखमींचा आकडा मिळणे बाकी आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लावण्यात आली असून त्यात अद्याप तरी शिथिलता देण्यात आली नसल्याचे अपर पोलिस अधीक्षक श्वेता खेडेकर यांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून PHOTOS मधून पाहा मलकापुरात उसळलेल्या दंगलीतील दगडफेक... जाळपोळ...
बातम्या आणखी आहेत...