आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात जिल्ह्यामधील २१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,मदत १२२ कुटुंबीयांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - नापिकी कर्जबाजारीपणामुळे या वर्षभरात जिल्ह्यातील २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, या पैकी १२२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाने मदतीसाठी पात्र ठरवले आहे. तर शेतकरी कुटुंबीयाची प्रकरणे प्रलंबित आहेत. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. शेतकरी अात्महत्या रोखण्यासाठी शासन विविध स्तरावर योजना आखून प्रयत्न करत असताना हा विषय अधिक चिंतेचा बनला आहे. दरवर्षी नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. जलयुक्त शिवाराचा गाजावाजा करत शेतकरी आतातरी सुखी होईल असे शासनाला वाटत असतांनाही शासनाची कोणतीही योजना कामी येत नसल्याचे चित्र आहे.

सोयाबीनला भाव नाही. रासायनिक खते महागली आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांना बियाणे कृषी साहित्य खरेदी करताना नोटाबंदीचा फटका बसत आहे. व्यापारी मालाचे पैसे देत नाहीत. बाजार समित्यांमध्ये पैश्याचा ठणठणाट आहे. एटीएममधून हजाराच्यावर मिळत नाहीत. अशा नानाविध अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. वर्षभरात २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे दिसत आहे.

आत्महत्येची कारणे
नापिकीमुळेसर्वाधिक आत्महत्या मार्च महिन्यात इतक्या झाल्या असून एप्रिल महिन्यात ८,मे महिन्यात ७, जानेवारी,जुलै सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी ४, फेब्रुवारी,जून अाॅगस्ट महिन्यात प्रत्येकी आत्महत्या ऑक्टोबर महिन्यात आत्महत्या झाल्या आहेत. कर्जबाजारीपणामुळे सर्वाधिक आत्महत्या मार्च महिन्यात इतक्या झाल्या असून ऑक्टोबर महिन्यात ८, जानेवारी, जुलै, ऑगस्ट सप्टेंबर, नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी ४, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे,जूनमध्ये प्रत्येकी आत्महत्या ऑक्टोबर महिन्यात आत्महत्या झाल्या आहेत. आजारपणामुळे मार्च महिन्यात सप्टेंबर महिन्यात आत्महत्या झाल्या आहेत. घरगुती भांडणातून एकाने आत्महत्या केली आहे. यापैकी आत्महत्यांची ८७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. तर व्यसनाधीनतेमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल आहे.
बेरोजगारीमुळे २४ तर नैराश्यामुळे २९ आत्महत्या : बेरोजगारीमुळेजुलै सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ६, तर ऑगस्ट ऑक्टोबर मध्ये प्रत्येकी ४, फेब्रुवारीमध्ये नोव्हेंबर मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. नैराश्य आल्याने जुलै महिन्यात सर्वाधिक आत्महत्या जुलै महिन्यात, ऑगस्ट महिन्यात ४, जून महिन्यात ३, ऑक्टोबर महिन्यात ७, फेब्रुवारी मार्च महिन्यात २, जानेवारी एप्रिल महिन्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

महिना आत्महत्या केलेल्यांची संख्या आत्महत्या मदत मिळाली
जानेवारी ०९ ०८
फेब्रुवारी १६ १२
मार्च २२ १८
एप्रिल १६ १४
मे १८ १३
जून १८ 2
जुलै २६ ०८
ऑगस्ट २२ १०
सप्टेंबर २१ ०८
अॅाक्टोबर ३१ १३
नोव्हेंबर १८ ०६

नवे आर्थिक संकट : जुन्यापाचशे- हजाराच्या नोटा शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी व्यापाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. ते कापूस सोयाबीनला जादा भाव देण्यास तयार आहेत. पण नव्या नोटा पाहिजे असल्यास भाव पाडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. हे एक नवे आर्थिक संकट त्यांच्यासमोर आहे.
बातम्या आणखी आहेत...