आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीचे माजी संचालक लक्ष्मण नन्नावरेंचा वादातून खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावराजा - बाजार समितीचे माजी संचालक तथा शिवसेना कार्यकर्ते लक्ष्मण सर्जेराव नन्नावरे वय ३५ यांचा मृतदेह शहरातील आमना पुलानजीक असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पायथ्याशी आढळून आला आहे. ही घटना आज डिसेंबर रोजी सकाळी वाजता उघडकीस आली. या प्रकरणी मृतक नन्नावरे यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पिंपळनेर येथील रहिवासी लक्ष्मण नन्नावरे यांचा मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बंधाऱ्यांच्या चवथ्या क्रमांकाच्या गेट खाली मृतदेह पडलेला दिसून आला. मृतकाच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्त साचलेले होते. तर बाजूला मोबाईल होता. सोमवारी रात्री ही घटना घडल्याने या प्रकरणातील नेमके सत्य काय आहे, या बाबत शहरात चर्चा सुरू होती. मृतक लक्ष्मण नन्नावरे यांचा भाऊ संभाजी नन्नावरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यामध्ये काही दिवसापूर्वी बाजार समितीची निवडणूक झाली.
अाठ ते दहा दिवसांपूर्वी याच निवडणुकीच्या कारणावरून नितीन पाटोळे, संदीप ससाणे, राजू कांबळे अल्पेश गोफने यांनी माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशी तक्रार दाखल करून उपरोक्त चार जणांवर संशय व्यक्त केला. या तक्रारीवरून पोलिसांनी चारही युवकांना आज मंगळवारी सकाळीच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महाडीक हे करीत आहेत. दरम्यान, पंचनामा केल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविला. दुपारी पिंपळनेर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी केली पाहणी
याघटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक श्वेता खेडकर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, आरोपीचा शोध घेऊ शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...