आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३१ जुलै रोजी \'ब्ल्यू मून\'चा योग, वाचा का म्हणतात महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला \'ब्लू मून\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- येत्याशुक्रवार दिनांक ३१ जुलै २०१५ रोजी "ब्ल्यू मून'चा योग आहे. या दिवशी याच महिन्यातील दुसरी पौर्णिमा आहे. पहिली पौर्णिमा दिनांक जुलै रोजी होती. जेव्हा कॅलेंडरच्या एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला "ब्ल्यू मून' म्हणण्याचा प्रघात आहे.

कोणत्याही दोन पौर्णिमांमध्ये २९.५ दिवसांचे अंतर असते. त्यामुळे जेव्हा पहिली पौर्णिमा महिन्याच्या सुरुवातीस येते, तेव्हा दुसरी पौर्णिमा त्याच महिन्याच्या शेवटी येते. अशा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून म्हणण्याची पद्धत आहे. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने या महिन्यात कधीच दोन पौर्णिमा येत नाही. हा महिना वगळता कोणत्याही महिन्यात दोन पौर्णिमा येऊ शकतात. पुरातनकाळी हंगामातील तिसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून म्हणण्याची पद्धत होती. तर काही भागात, जेव्हा एका वर्षात १३ पौर्णिमा येतात, तेव्हा १३ व्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून म्हणण्याचा पायंडा होता. अलीकडच्या पद्धतीनुसार यापूर्वी ब्ल्यू मूनचा योग दिनांक ३१ मे २००७, ३१ डिसेंबर २००९, ३१ आॅगष्ट २०१२ रोजी आला होता. तर यानंतर असा योग ३१ जानेवारी २०१८, ३१ मार्च २०१८ ३१ ऑक्टोंबर २०२० मध्ये येईल. कधी - कधी एकाच वर्षात दोनदा ब्ल्यू मून येतो. जेव्हा पहिला ब्ल्यू मून जानेवारी महिन्यात येतो, तेव्हा त्याच वर्षी दुसरा ब्ल्यू मून मार्चमध्ये येतो. कारण या दोन महिन्यांमध्ये असलेला फेब्रुवारी महिना फक्त २८ दिवसांचा असतो. दोनदा ब्ल्यू मून येण्याचे चक्र हे १९ वर्षांचे असते. असा योग यापूर्वी १९९९ साली आला होता यापूढे तो २०१८ मध्ये येईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा, केव्हा झाली होती "ब्ल्यू मून'ची पहिली नोंद