आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुखांना तर काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षांना घरघर, सोशल मीडियावरून नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हयातील नऊ नगर पालिका निवडणुकांच्या नगराध्यक्षपदाच्या निकालानंतर सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाला घरघर लागल्याचे चित्र असून, भाजप मात्र पाच जागी नगराध्यक्ष निवडून आणण्यात वरचढ ठरला आहे. काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, खासदार शिवसेनेचे असताना जिल्ह्यात शिवसेनेचा एकही नगराध्यक्ष झाल्याने सैनिकांची धडधड वाढली आहे. काहीही असो, परंतु बुलडाण्यात, मेहकरात आणि देऊळगावराजा येथे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा पराभव अनाकलनीय आहे. होणारी ही पडझड बघता आता जिल्हा संपर्क प्रमुखांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सेनेतच साेशल मीडियावरून होत आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रमुखांनाही असेच जबाबदार धरण्यात येत आहे.

थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लागल्यानंतर पक्षांना आपसुकच जिल्ह्यात आपले नेतृत्व दाखविण्याची संधी आली होती. मात्र, भलत्या ठिकाणी ताकद दाखवू नये. याचीही जाण पक्षांच्या जिल्हा नेतृत्वाला होती. तर मतांच्या समीकरणावरही उमेदवार देऊन नगराध्यक्षपद पक्षाच्या हातात ठेवण्यासाठी प्रयत्न केला गेला. सर्व प्रयत्न झाले निकाल लागल्यानंतर मात्र अनेक कुरबुरी आता बाहेर येऊ लागल्या आहेत.

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकाही आता होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पक्षातील नेतृत्वाच्या चुका लक्षात आणून देण्याचा प्रयत्न होत असतांनाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांना घरातूनच विरोध झाला. त्यातच पक्षातूनही विरोधाला सुरुवात झाली. देऊळगाव राजा येथील अनिल सावजी यांनी या विराेधाला हवा घातली. त्यानंतर गुलमोहर हॉटेलवरील काँग्रेसच्या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांची बैठकही गाजली. सरळ राष्ट्रीय नेते मुकुल वासनिकांना जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे विरोध करत असल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्यांचे अध्यक्षपद बदलाच्या हालचाली पक्षात सुरू झाल्या आहेत. असे असतांनाच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्याबद्दलही सोशल मीडियावर सध्या शिवसैनिकांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.


त्यावेळी नाराजीनामा आता हवा राजीनामा
शिवसेना नेतृत्वालाच वेठीस धरून मराठा मूक मोर्चाबद्दल व्यंगचित्र प्रसिध्द केल्याबद्दल राजीनामा देत असल्याचा संदेश सोशल मीडियावरुन खासदार प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तियांनी दिला होता. तेव्हा खळबळ माजविल्यांनतर आता निवडणुकीतील अपयशाबाबतही सोशल मीडियावरूनच त्यांना राजीनामा मागितल्या जात असल्याचे संदेश मोठया प्रमाणात झळकत आहेत. कदाचित हा संदेश जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांपर्यंत पोहचलाही असेल.

बुलडाण्यातील पराभव शिवसेनेला रुचणारा
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीपासून तर प्रचारापर्यंत माजी आमदार विजयराज शिंदे यांना दूर ठेवण्यात आले होते. त्यातच पूजा गायकवाड यांचे पती संजय गायकवाड यांनी कोणत्याही नेत्याची सभा होताही निवडून येण्यासाठी मेहनत घेतली. परंतु, मतदान यंत्र फोडल्याचा संदेश सोशल मिडियावरुन पसरला. परिणामी शहरातील ५४.४० टक्के मतदारंानीच मतदान लोकांनी करून आपली नाराजी दर्शवली. मात्र ती नकारात्मक मतांच्या माध्यमातून दाखवली नाही.

एमआयएमची मुसंडी, भाजपची घसरगुंडी
मलकापूर येथे भाजपचे नेते आमदार चैनसुख संचेती यांनी आघाडी उघडून शिवचंद्र तायडे यांना उभे केले. त्यातच काँग्रेसची मते खाण्यासाठी एमआयएम चा उमेदवार उभा राहिला. असे असतानाही काँग्रेसचे हरीश रावळ निवडून आले तसेच एमआयएमचे नगरसेवक निवडून आले. एवढेच नव्हे तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला ७,५०० मतदान मिळाले. एमआयएमने मलकापुरात मुसंडी मारली असताना भाजपची मात्र घसरगुंडी झाली आहे.

तीन पदाधिकारी तरी मेहकर ताब्यात नाही
खासदार प्रतापराव जाधव यांचा मेहकर मतदारसंघ हा प्रतापगड म्हणून ओळखल्या जात होता. परंतु, मागच्या नगर पालिका निवडणुकीत तो ढासळला. त्यानंतर पाच वर्षे होऊन नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडावयाचा होता. या वेळी स्वत: खासदार जाधव, आमदार संजय रायमुलकर आणि युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव हे मेहकरात असतांनाही मेहकरचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेले.
बातम्या आणखी आहेत...